Dr Ram Vilas Vedanti : श्रीरामजन्मभूमी आंदोलनातील संत डॉ. रामविलास दास वेदांती यांचा देहत्याग

संत डॉ. रामविलास दास वेदांती

रिवा (मध्यप्रदेश) – भाजपचे माजी खासदार आणि श्रीरामजन्मभूमी आंदोलनातील प्रमुख संत डॉ. रामविलास दास वेदांती यांनी येथे देहत्याग केला. तेथे त्यांची रामकथा चालू होती. या वेळी त्यांची प्रकृती बिघडली. २ दिवसांपासून ते येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार घेत होते. आता त्यांचे पार्थिव अयोध्येत नेण्यात येणार आहे. रामविलास वेदांती हनुमानगढीचे महंत अभिराम दास यांचे शिष्य होते. अयोध्येत त्याचा वशिष्ठ भवन नावाचा एक आश्रमही आहे. वर्ष २०२० मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांची बाबरी ढाचा पाडल्याच्या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती.