
गौहत्ती (आसाम) – निवृत्त वायूसेना अधिकारी कुलेंद्र शर्मा याला पाकसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. कुलेंद्र याचा पाकिस्तानी हस्तकाशी संबंध असल्याचा आरोप आहे. तो भारतीय सैन्याशी संबंधित संवेदनशील माहिती या हस्तकाला देत होता. त्याचा भ्रमणभाष आणि लॅपटॉप यांमधून संशयास्पद सामुग्री मिळाली आहे.
अरुणाचल प्रदेशामध्ये २ संशयितांना अटक
अरुणाचल प्रदेशाची राजधानी इटानगरमध्ये पोलिसांनी हेरगिरीच्या आरोपाखाली २ जणांना अटक केली. पश्चिम सियांग जिल्ह्यातील आलो येथून एकाला, तर चांगलांग जिल्ह्यातील मियाओ येथून अन्य हेराला अटक करण्यात आली. यांपैकी एकाची ओळख हिलाल अहमद अशी झाली आहे. तो जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी दुसर्याचे नाव सांगितले नाही. हिलाल त्याच्या सहकार्यांना सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती पाठवत होता.
संपादकीय भूमिकाअशा देशद्रोह्यांना भर चौकात फाशीची शिक्षा दिली पाहिजे ! |
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !