माहितीच्या अधिकारातून उघड माहिती !

मुंबई – महानगरपालिकेच्या के.ई.एम्., नायर आणि कूपर या रुग्णालयांतील जैववैद्यकीय कचर्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येत नसल्याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (एम्.पी.सी.बी.) करण्यात आली होती. त्यानंतर मंडळाने या ३ रुग्णालयांमध्ये केलेल्या पडताळणीमध्ये जैववैद्यकीय कचर्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यात येत नसल्याचे समोर आले. त्यामुळे मंडळाने या तिन्ही रुग्णालयांना नोटीस बजावली आहे.
या तक्रारींच्या संदर्भात मंडळाने केलेल्या कारवाईची माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत माहिती मागवली होती. अपुर्या जागेमुळे कचरा जागेबाहेर ठेवण्यात आला होता, तसेच त्या दिवशी कचरा उचलणारी गाडी वेळेवर न आल्यामुळे जैववैद्यकीय कचरा उचलला गेला नव्हता, असे स्पष्टीकरण नायर रुग्णालयाकडून मंडळाला देण्यात आले आहे; मात्र के.ई.एम्. आणि कूपर रुग्णालयांकडून ‘अशाप्रकारे कोणतीही नोटीस बजावण्यात आली नाही’, असे सांगण्यात आले. कूपर रुग्णालयामध्ये जैववैद्यकीय कचरा शास्त्रीय पद्धतीने वेगळा करून साठवण्यात आला नव्हता, तसेच सुका आणि ओला कचरा साठवणुकीच्या खोलीत एकत्र टाकला होता. येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हे बंद आढळले.
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था