श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांचे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’विषयीचे गौरवोद्गार !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने गोव्यामध्ये मे मासामध्ये ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ अत्यंत यशस्वी पार पडला. त्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतील. त्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाला एका छोट्या कुंभमेळ्यात असल्याचा आनंद झाला. राष्ट्रीय विचारांच्या गंगेत, भावभावना आणि प्रेम-आत्मीयतेच्या यमुनेत, तसेच गुरुजींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) आध्यात्मिक जनजागृती आणि उत्कृष्ट मार्गदर्शनाच्या सरस्वती नदीमध्ये स्नान करून आम्ही पावन झालो. ‘गुरूंचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद असेल, तर काहीही साध्य करता येते’, हे शंखनाद महोत्सवाने सिद्ध केले आहे. देवदुर्लभ कार्यकर्ते, नि:स्वार्थ साधक, राष्ट्राविषयीची अतुलनीय निष्ठा आणि गुरूंविषयीचे पारदर्शक प्रेम-आदर हे या संमेलनाच्या यशाचे आधारस्तंभ ठरले. साधक नेहमी हसतमुख असत, ज्यामुळे प्रतिनिधींमध्ये उत्साह निर्माण होत असे. साधकांच्या चेहर्यावर कधीही कंटाळा किंवा थकवा दिसत नव्हता. शांतता, आत्मीयतेची भावना, उत्साहाचा झरा आणि समाधानाने दिलेली उत्तरे या सर्वांमुळे सहभागी झालेल्यांना प्रेरणा मिळाली.

१. देशातील विविध हिंदुत्वनिष्ठ एकत्र आणणे, हे दैवदुलर्भ कार्य !
देशातील सर्व राज्यांमधील विविध भाषिक, विविध विचारसरणी असणारे हिंदुत्वनिष्ठ, उद्योजक, व्यापारी, विविध संघटना आणि संयोजक यांना एकाच छताखाली अन् एकाच विचारसरणीखाली एकत्र आणणे, हे एक दैवदुर्लभ कार्य आहे. हे केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामुळेच शक्य आहे, असे ठामपणे म्हणता येईल. हिंदु संघटनांनी एकत्र यावे, हिंदूंनी एकजूट व्हावे आणि जागृत व्हावे, असे भाषणात बोलणारे अनेक आहेत; परंतु सनातन संस्थेच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी देशातील अन् आंतरराष्ट्रीय स्तरावरील हिंदु नेत्यांना एकाच व्यासपिठावर आणले, हे अद्भुत आणि अकल्पनीय आहे. हे केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनाच शक्य आहे, असे म्हणता येईल. गुरुदेवांची तप:श्चर्या आणि त्याग यांचे प्रतिक असलेल्या सनातन संस्थेने २६ वर्षे पूर्ण केली. त्याची इतिहासात नोंद झाली आहे.
२. महोत्सवात विविध वैचारिक प्रवाहातून जडणघडण
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त वैचारिकतेचा प्रवाह वहात होता. आजच्या आवश्यकतेनुसार विषय घेतले गेले. देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी धार्मिक आचरणाची शक्ती अन् लढाऊ वृत्ती यांच्या आवश्यकतेवर विविध वक्त्यांकडून मार्गदर्शन झाले. संतांची वाणी, तज्ञांचे मार्गदर्शन, तरुणांची गर्जना, विदेशी हिंदु नेत्यांचा आक्रोश इत्यादी अत्यंत समर्पक विषयांवर प्रबोधन झाले. योग्य व्यक्तींना ओळखणे, पात्र नेत्यांना प्रेरणा देणे आणि काही निवडक लोकांना पुरस्कृत करणे योग्य होते. त्यामुळे हिंदूंना प्रेरणा, प्रोत्साहन आणि अनुकरण यांसाठी मार्गदर्शन मिळाले.
स्वतःला मिळालेला ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार, म्हणजे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा आशीर्वाद’ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्ते मला ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार मिळाला. त्यामुळे माझ्या आयुष्यात धन्यता आणि सार्थकता यांची भावना निर्माण झाली आहे. वर्ष २००६ मध्ये डॉ. प्रवीण तोगडिया यांनी एक गोष्ट सांगितली होती, ‘काही जण मुसलमानांना जवळ घेतात; पण ते तुम्हाला स्वीकारणार नाहीत.’ हे सत्य ठरले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी माझ्यासारख्या सामान्याला पुरस्कृत करून माझे दायित्व आणखी वाढवले आहे. ते मी सहर्ष स्वीकारतो. हा पुरस्कार मी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा आशीर्वाद’ म्हणून स्वीकारला आहे.
– श्री. प्रमोद मुतालिक
गदग येथील एका पूज्य स्वामीजींनी प्रमोद मुतालिक यांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार मिळाल्याविषयी अभिनंदन करणे !
गदग येथील एका पूज्य स्वामीजींनी मला ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार मिळाल्याविषयी अभिनंदन केले. ते मला म्हणाले, ‘‘मुतालिकजी, देशातील दुसरी सर्वांत मोठी हिंदु संघटना असलेल्या सनातन संस्थेने तुमची निवड करून पुरस्कार दिला. ही कर्नाटकसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सरकारी पुरस्कार हे पैशांनी विकत घेतलेले असतात किंवा आमदार, खासदार, मंत्री यांच्या प्रभावाने मिळवलेले असतात; परंतु तुम्हाला दिलेला पुरस्कार हा परिश्रम, त्याग आणि हिंदुत्व यांच्यासाठी लढलेल्या एका प्रखर हिंदुविराला दिला आहे. त्यासाठी मी सनातन संस्था आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेजी यांचे अभिनंदन करतो. त्यानंतर तुमचेही अभिनंदन !’’
– श्री. प्रमोद मुतालिक
३. सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या तपस्येचे फळ !
सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव हा एक मोठा वैचारिक विजय आहे. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील तत्कालीन काँग्रेस राज्य सरकारांनी सनातनच्या साधकांचा कितीतरी छळ, अपमान, अपप्रचार केला, तसेच अटक अन् खटलेही प्रविष्ट केले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची दूरदृष्टी !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दुर्लक्षित आणि उपेक्षित हिंदु नेते, तसेच कार्यकर्ते यांची मनापासून निवड करून त्यांना ‘हिंदु राष्ट्र रत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री पुरस्कार’ देऊन सन्मानित केले, हे उत्कृष्ट आहे. हिंदु संघटना लहान असो कि मोठी, प्रभावशाली असो कि परिणामकारक यांचा विचार न करता देशाच्या वर्तमान परिस्थितीनुसार केवळ आवश्यकतेचा विचार करणे, यातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची दूरदृष्टी दर्शवते.
– श्री. प्रमोद मुतालिक
एवढेच नाही, तर खोट्या हत्यांच्या आरोपांमुळे संस्थेवर बंदी घालण्यापर्यंत चर्चा झाली. हे सर्व शांतपणे सहन करत, कायदेशीर लढा देऊन आणि वैचारिकदृष्ट्या सामोरे जाऊन विजय मिळवणे, हे गुरुदेवांच्या तपस्येचे फळ आहे. आज छळ करणारी सरकारे पालटली आणि आजच्या सरकारांनी सनातन संस्थेविषयी सन्मान, मान्यता अन् आदर दर्शवला, हे मोठे आहे. सनातन संस्थेचे सहस्रो वेळा अभिनंदन आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना कृतज्ञतापूर्वक प्रणाम !
– श्री. प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना, कर्नाटक. (२९.५.२०२५)
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !