सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव २०२५

भारत मंडपम्, देहली : ‘स्वराज्य आणि संस्कृती’ या सत्रात ‘बांगलादेशी घुसखोरी : समस्या आणि उपाय’ या विषयावर बोलतांना भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते श्री. प्रदीप भंडारी म्हणाले की, गेली ११ वर्षे भारतीय लोकसंख्याशास्त्राच्या संदर्भात संशोधन केल्यावर पुढील सूत्रे लक्षात आली –
१. मुसलमानबहुल मतदारसंघात कधीही हिंदु उमेदवार निवडून येत नाही; मात्र हिंदूबहुल मतदारसंघात अल्पसंख्य समाजाचे उमेदवार निवडून येतात.
२. एखादा हिंदुबहुल भाग मुसलमानबहुल भागाने वेढलेला असेल, तर अनेकदा तेथील हिंदूंना घर सोडून पळून जावे लागते आणि काही काळातच तो हिंदूबहुल भागही मुसलमानबहुल बनतो; मात्र हिंदुबहुल भागांनी वेढलेल्या मुसलमानबहुल भागातून कुणी घर सोडून गेल्याची एकही घटना आढळलेली नाही.
३. ज्या भागातील अल्पसंख्यांक ३३ टक्क्यांहून अधिक होतात, तेथील राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, व्यावहारिक स्थिती ही अल्पसंख्यांकधार्जिणी बनते. तेथे अल्पसंख्यांक प्रबळ ठरतात, हा खरा चिंतेचा विषय आहे.
४. वर्ष २०४० पर्यंत भारतातील १०० जिल्हे मुसलमानबहुल बनतील, तर ९० जिल्ह्यांमध्ये हिंदूंची संख्या ७० टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत अल्प होईल. जेव्हा अशा पद्धतीने एखाद्या देशाचे लोकसंख्याशास्त्र पालटते, तेव्हा तेथील लोकतंत्रही पालटते. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी चिंतन, मनन आणि प्रयत्न झाले पाहिजेत. हिंदूंनी जसा राममंदिराच्या स्थापनेसाठी कठोर लढा दिला, तसाच संघटितपणे लढा द्यावा लागेल, तरच भावी सनातनी पिढ्या, भारतीय लोकशाही, भारताची एकता आणि अखंडता टिकून राहील.
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’