नागपूर हिवाळी अधिवेशन २०२५
विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन !
(‘अँन्टी लँड ग्रॅबिंग’ कायदा म्हणजे मंदिरांच्या भूमी अनधिकृरित्या कह्यात घेण्याच्या विरोधातील कायदा)

नागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) – येथील विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने ‘अँन्टी लँड ग्रॅबिंग’ कायदा करण्याविषयी, मुंबईत १९ ते २१ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’वर बंदी घालावी, तसेच मंदिरांचे मुद्रांक शुल्क माफ करावे, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत पोळके उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिन्ही निवेदनांचा विषय समजावून घेतला, तसेच पुढील कार्यवाहीसाठी निवेदन सचिवांना पाठवून दिले.
Nagpur: Maharashtra Mandir Mahasangh submits a memorandum to @Dev_Fadnavis demanding :
🔸“Anti-Land Grabbing” law for temples
🔸 Ban on the Sunburn Festival (19–21 Dec, Mumbai)
🔸 Waiver of temple stamp duty✊🏻The move comes after thousands of acres of temple land were seized… pic.twitter.com/39VRUfB1wg
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 10, 2025
देवस्थानाच्या सहस्रो एकर शेतभूमी भूमाफियांनी हडपल्याने त्यांच्या संरक्षणासाठी गुजरात आणि कर्नाटक यांच्या धर्तीवर ‘अँन्टी लँड ग्रॅबिंग’ कायदा तात्काळ लागू करण्याविषयी, तसेच विशेष अन्वेषण पथके (एस्.आय.टी.) स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !