देहलीतील ‘भारत मंडपम्’मध्ये भरवण्यात येणार शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांचे प्रदर्शन !

नवी देहली – छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्यक्ष वापरलेली दुर्मिळ शस्त्रे, युद्धपरंपरा आणि धर्मरक्षणाची जाज्वल्य प्रेरणा यांचा संगम ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त पहायला मिळणार आहे. हा सोहळा, म्हणजे केवळ प्रदर्शन नसून हिंदवी स्वराज्याच्या तेजातून ‘हिंदु राष्ट्रा’ची नवी प्रेरणा देणारा आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अनुभव ठरणार आहे. ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’च्या प्रस्तुतीत आणि ‘सनातन संस्थे’चे आयोजन असलेला ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा भव्य सोहळा १३ आणि १४ डिसेंबर २०२५ या दिवशी नवी देहलीतील ‘भारत मंडपम्’ (इंद्रप्रस्थ) येथे होत आहे.
या ठिकाणी प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्यक्ष हस्तस्पर्श केलेल्या भवानी तलवारीसह अन्य ८ दुर्मिळ शस्त्रे जनतेसमोर येत आहेत. या शिवकालीन प्राचीन शस्त्रप्रदर्शनात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा पराक्रम सांगणारी शस्त्रे आणि विजयनगर साम्राज्याची तलवार यांचाही समावेश आहे.

१. मराठ्यांचे प्रगत तंत्रज्ञान आणि युद्धकला
‘लोखंड ते शस्त्र’ या संकल्पनेवर आधारित १५ विशेष कक्षांमधून मराठ्यांचे धातूशास्त्र, शस्त्रनिर्मितीची टप्प्याटप्प्याची प्रक्रिया आणि शिवकालीन विविध युद्धशैली यांचे प्रभावी दर्शन घडवले जाणार आहे. यामुळे मराठे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर उत्तम तंत्रज्ञान, चिलखते, किल्ले आणि शस्त्रसज्जता या सर्व अंगांनी प्रगत सामरिक संस्कृती यांचे धनी होते, हे ठळकपणे जाणवते.
२. मराठा स्त्रियांचा ‘योद्धा’ दर्जा अधोरेखित
या प्रदर्शनात युद्धात सहभागी झालेल्या वीर माता-भगिनींनी वापरलेली शस्त्रेही सन्मानाने प्रदर्शित केली जाणार आहेत. त्यामुळे मराठा समाजात स्त्रियांना शस्त्र बाळगण्याचा आणि आवश्यकता भासल्यास रणांगणात उतरून लढण्याचा हक्क अन् प्रत्यक्ष सहभाग दोन्ही होते, हे ठोसपणे पुढे येते. महाराणी ताराबाई, येसूबाई यांची राजकीय नेतृत्वाची ओळख सर्वपरिचित असली, तरी या शस्त्रांमुळे त्यांची आणि इतर स्त्रियांची प्रत्यक्ष ‘युद्धशक्ती’ही ऐतिहासिक पुराव्यांसह समोर येणार आहे.
हर हर महादेव ।

३. शत्रूची युद्धनीती आणि प्रभावी प्रत्युत्तराची परंपरा
शिवकाळातील विविध प्रांतांतील वस्तू, शस्त्रनिर्मितीचा प्रवास आणि लढवय्यांची स्थिती यांचा प्रत्यक्ष नमुन्यांद्वारे परिचय होणार असल्याने या माध्यमातून इतिहासातील अनेक शंकांना वस्तूनिष्ठ उत्तर मिळणार आहे. इस्लामी आक्रमकांची (उदा. उमर महंमद, खालिद महंमद इत्यादी) शस्त्रेही प्रदर्शनात आहेत, ज्यातून भारताने केवळ बचाव केला नाही, तर शत्रूच्या युद्धनीतीचा अभ्यास करून प्रभावी प्रत्युत्तर देण्याची परंपरा जपली, हे स्पष्ट होते.
४. ‘हिंदु राष्ट्रा’ची प्रेरणा देणारा सोहळा !
छत्रपती शिवाजी महाराज यांनी तलवारीसह अद्वितीय युद्धनीती, कुशल प्रशासन, भूगोलाचा योग्य वापर आणि निष्ठावान मावळ्यांची संघटनशक्ती यांच्या आधारे ‘हिंदवी स्वराज्य’ उभे केले. आतंकवाद, नक्षलवाद आणि पाश्चात्त्यांचे अंधानुकरण या सध्याच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव धर्माधिष्ठित जीवनमूल्ये, संस्कृती, सुरक्षा आणि शौर्य यांच्या जोरावर आधुनिक आव्हानांविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो. या दुर्मिळ शस्त्रप्रदर्शनातून तरुणांसमोर स्पष्ट संदेश देता येईल, ‘हिंदु राष्ट्र स्थापनेचे बळ केवळ राजकीय घोषणांमध्ये नसून ते प्रत्येक नागरिकाचे आत्मिक बळ, स्वसंरक्षणाची सिद्धता आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार यांत आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी
US-Based Christian Missionary : ख्रिस्ती मिशनरी संस्था आणि ७ व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद
भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतर भारत आणि अमेरिका यांच्यात तणाव
सीमावर्ती जिल्ह्यांतील लोकसंख्याशासत्रीय पालटांचा अभ्यास करा ! – Amit Shah
आता शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट होणार !