देहली येथे होणारा सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या साधकांच्या रक्षणासाठी आणि समष्टीच्या कल्याणासाठी नियमित अग्निहोत्र करत असतात. १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी देहलीतील भारत मंडपम् येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी अग्निहोत्र करतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ भारत मंडपम्चे छायाचित्र पाहून त्यासाठी प्रार्थना करतात.
१ डिसेंबर (गीता जयंती) या दिवशी सकाळी अग्निहोत्र करतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘हे श्रीमन्नारायण, भारत मंडपम्मध्ये होणार्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला तुम्ही उपस्थित राहून हा महोत्सव तुम्ही निर्विघ्नपणे करून घ्या, अशी तुमच्या चरणी आम्ही भक्तगण प्रार्थना करत आहोत’, अशी प्रार्थना केली. त्या वेळी त्यांना सूक्ष्मातून जाणवले की, ‘श्री अग्निनारायण आज सकाळी भारत मंडपम्मध्ये प्रवेश करत आहे. नंतर अग्निनारायण स्वतः व्यासपिठावर आरूढ झाले आहेत.’ सूक्ष्मातून हे दृश्य दिसल्यानंतर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १ डिसेंबरला असलेली तिथी पाहिली असता त्या दिवशी ‘गीता जयंती’ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याच्या विश्वरूपाचे दर्शन देऊन गीतेचा उपदेश केल्याचा तो दिवस ! सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेवरही भगवान श्रीकृष्णाच्या विश्वरूपाचे चित्र आहे. यावरून श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना जाणवले, ‘गीता जयंतीच्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला जसे विश्वरूपदर्शन घडवले, ते तत्त्वच जणू भारत मंडपम्मध्ये प्रवेश करत आहेत आणि तेच महोत्सव निर्विघ्नपणे पार पाडणार आहेत. आपण केवळ निमित्तमात्र त्या ठिकाणी जाऊन येणार आहोत. या कार्यक्रमाला स्वतः भगवंत उपस्थित असणार, हे आमचे पुष्कळ मोठे भाग्य असणार आहे.’
‘अग्निहोत्र करतांना अग्निनारायण आणि भारत मंडपम्ची वास्तूदेवता यांना प्रार्थना करत असल्याने ‘स्वतः अग्निनारायणाने हा प्रसाद दिला’, असे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना जाणवले.
|
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुभद्रा ज्ञानोबा गोरे (वय ९२ वर्षे) !
व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांहून अधिक झाली की, तिच्या मनातील नकारात्मक विचार जाऊन तिची ईश्वराची ओढ वाढते !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘साधकांच्या त्रासांवरील उपाय शोधण्याच्या पद्धतीत होत गेलेले पालट’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीचा ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ ‘ऑनलाईन’ पहातांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !