कोलकाता येथे सामूहिक गीता पाठाला ५ लाख भाविकांची उपस्थिती !
(‘गजवा-ए-हिंद’ म्हणजे भारताचे इस्लामीकरण करण्यासाठीचे युद्ध)

कोलकाता (बंगाल) – येथे प्रतिवर्षीप्रमाणे ७ डिसेंबरला सामूहिक गीता पाठाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ५ लाख भाविक उपस्थित होते. यात मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री, तसेच अनेक साधू-संत सहभागी झाले होते.
📖✨ 5 lakh devotees united in Kolkata for a historic Mass Gita Paath!
Pandit Dhirendra Krishna Shastri’s message is loud & clear:
🇮🇳🔥 India needs Bhagwa-e-Hind, not Ghazwa-e-Hind! pic.twitter.com/eray3Oq4UX— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 7, 2025
‘देशात ‘गजवा-ए-हिंद’ नाही, तर ‘भगवा-ए-हिंद’ हवा आहे, म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य आणि हिंदु सनातन संस्कृतीचा आदर हवा आहे’, असे विधान पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी या वेळी केले.

पंडित धीरेद्रकृष्ण शास्त्री यांच्या म्हणण्यानुसार सनातन एकता हेच देश आणि जग यांच्या शांततेचे आणि स्थैर्याचे साधन आहे. जात, पंथ, संप्रदाय या भेदांवर मात करून हिंदुत्व आणि सनातन धर्म यांची पर्वा करण्याची आवश्यकता आहे.
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
चर्चासत्राच्या वेळी संगीत विभागातील साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांना आलेल्या अनुभूती !
महाराष्ट्र सरकारने हिंदुहितकारक निर्णयाची ऐतिहासिक संधी साधावी !