धार्मिक असलेल्या तमिळनाडूला आतंकवादाचा धोका !

‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !

१. तमिळनाडूची आतंकवादाचे केंद्र बनण्याकडे वाटचाल

तमिळनाडू ही अनेक योगी आणि संत यांची पवित्र भूमी आहे. येथे धर्माचे मोठे कार्य झाले आहे; परंतु हाच तमिळनाडू सध्या आतंकवादी कारवायांची भूमी बनत चालला आहे.  तमिळनाडू आणि श्रीलंका येथील धर्मांधांचे आतंकवाद्यांशी असलेले लागेबांधे उघड होतात. काहींचा संबंध थेट अफगाणिस्तानच्या तालिबान्यांशीही आहे. वर्ष १९९३ मध्ये चेन्नईच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात बाँबस्फोट झाला होता. वर्ष १९९८ मध्ये कोईम्बतूर येथे साखळी बाँबस्फोट झाले होते. पुन्हा वर्ष २०१४ मध्ये चेन्नई येथे ‘पाईप’ बाँबस्फोट झाला होता. वर्ष २०२२ मध्ये कोईम्बतूर येथे चारचाकी गाडीत बाँबस्फोट झाला होता. तमिळनाडूमध्ये धर्मांधांनी १५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांची हत्या केली, तर अनेक हिंदुत्वनिष्ठांना ठार मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. यानंतरही तमिळनाडू येथील शासनकर्ते इस्लामी आतंकवादाच्या विरोधात एक शब्दही बोलत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस हे राज्य आतंकवाद्यांचा कारखाना बनत चालले आहे. तमिळनाडूचे सरकार आणि राजकीय नेते नास्तिक अन् फुटीरतावादी असले, तरी तमिळनाडूची जनता मात्र राष्ट्रप्रेमी आणि धार्मिकच आहे.

२. हिंदुविरोधी तमिळनाडू शासनकर्ते

श्री. पाला संतोषकुमार

आमच्या संघटनेच्या अंतर्गत आम्ही धर्मरक्षण, धर्मजागृती आणि हिंदूसंघटन यांचे कार्य करतो. विशेषतः हिंदु युवक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जागृती आणण्याचा प्रयत्न करतो. स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणीनुसार आम्ही हिंदु युवकांचा विकास करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही सातत्याने हिंदु धर्मविरोधी घटनांचा विरोध करतो. यासमवेतच तमिळनाडूच्या काही शहरांमध्ये हिंदु जागृतीचे कार्य करतो. मागील तमिळनाडू सरकारने आतंकवादी आणि फुटीरतावादी यांच्या विरुद्ध कार्य करणार्‍या हिंदु कार्यकर्त्यांना अटक करणे अन् त्यांच्यावर खटले प्रविष्ट करणे, अशा प्रकारची कृत्ये केली. हिंदु धर्माचे कार्य करत असल्यामुळे मलाही मार्च २०२३ मध्ये एका खोट्या खटल्यात अटक करण्यात आली होती; परंतु जे हिंदु आपल्या प्राणाची पर्वा करत नाहीत, ते अशा अटकेमुळेही घाबरत नाहीत. उलट माझ्यासारख्या हिंदुत्वनिष्ठांना अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देतात.’

– श्री. पाला संतोषकुमार, संस्थापक अध्यक्ष, ‘हिंदु इळैंगर येळूच्ची पेरवई’ (हिंदु युवा जागरूकता महासंघ), चेन्नई, तमिळनाडू.