
सांगली, १ डिसेंबर (वार्ता.) – सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५ लाख ३६ सहस्र खातेदारांची खाती रि-केवायसी (ग्राहकाला जाणून घेण्याच्या प्रक्रियेचे नुतनीकरण) अभावी गोठवण्यात आली होती. यांपैकी ६५ सहस्र ६९८ खातेदारांनी बँकेशी संपर्क साधून रि-केवायसी पूर्ण केली आहे. अद्यापही अनुमाने ५ लाख ३५ सहस्र खातेदारांनी रि-केवायसी न केल्याने त्यांची खाती गोठवलेलीच आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.
गेल्या आठवड्यात जिल्हा बँकेने रि-केवायसी नसलेल्या ५ लाख ३६ सहस्र खात्यांवर निर्बंध लागू केले. रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार बँकेने खातेदारांना वारंवार रि-केवायसी करण्याचे आवाहन केले होते; मात्र त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला रि-केवायसी पूर्ण न करणार्या खात्यांविषयी दंडात्मक कारवाई करण्याची चेतावणी दिली होती. राज्यातील अन्य बँकांवर अशा कारवाया झाल्याने जिल्हा बँक प्रशासनाने ५ लाख ३६ सहस्र खातेदारांना संदेश पाठवून त्वरित रि-केवायसी करण्याचे आवाहन केले.
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
आदिवासींच्या घरांच्या बांधकामाला मुसलमानांचा विरोध : पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर काम चालू