|
टोकियो (जपान) – जपान सरकारने देशात मुसलमानांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी बांधण्याचे प्रस्ताव स्पष्टपणे नकारले आहेत. ‘हे प्रस्ताव नाकारण्याचा निर्णय जपानी परंपरा आणि रूढी यांच्याशी सुसंगत आहे’, असे सरकारने म्हटले आहे. संसदेच्या सदस्या मिजुहो उमेमुरा यांनी, ‘जपानमध्ये मृतदेहावर अग्नीसंस्कार करण्याची पद्धत आहे. मुसलमान समुदायाने या समस्येवर मार्ग काढण्यासाठी मुसलमानाचा मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह त्याच्या मूळ देशात पाठवून तिथे दफन करण्याची प्रक्रिया करावी’, अशी सूचना केली आहे.
🇯🇵 Japan Rejects Demand for a Separate Muslim Cemetery
➡️ Cites lack of land availability
➡️ Advises Muslim community to send bodies to home countries for burial
Japan chose a firm, practical stand instead of appeasement. 🇯🇵💯
With India’s population rising fast, even burial… pic.twitter.com/kCgl2GTrhn
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 1, 2025
१. कब्रस्तान न बांधण्याचा निर्णय हा जपानच्या जुन्या सांस्कृतिक मूल्यांना प्राधान्य देणार्या धोरणाचा भाग आहे. देशात बौद्ध आणि शिंटो परंपरांचा प्रभाव असल्यामुळे अग्नीसंस्कार हीच अंत्यसंस्काराची मुख्य पद्धत आहे.
२. जपानमध्ये ९९ टक्क्यांहून अधिक लोक त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तिच्यावर अग्नीसंस्कार करतात.
३. शहरी भागांत भूमीची तीव्र टंचाई असल्याने मोठ्या प्रमाणावर कब्रस्तान बांधणे, हे कठीण आणि संवेदनशील बनले आहे.
४. या निर्णयामुळे जपानमध्ये रहाणारे अनिवासी आणि जपानी नागरिकत्व मिळवलेले मुसलमान यांच्यावर परिणाम होणार आहे. त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार मृतदेहाचे दफन करणेच अनिवार्य असते. त्यामुळे त्यांना आता मृत मुसलमानाचा मृतदेह त्याच्या मूळ देशात पाठवावा लागणार आहे.
संपादकीय भूमिकादेशातील मुसलमान समुदायाला चुचकारण्याऐवजी असा कठोर निर्णय घेणार्या जपान सरकारकडून भारताने बोध घ्यावा ! भारतातही लोकसंख्येच्या विस्फोटामुळे मृत मुसलमानांचे दफन करण्यासाठी भूमीची कमतरता भासत आहे. भविष्यात भारतालाही अशा समस्येवर कठोर निर्णय घेण्याची वेळ येणार आहे ! |

डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
बांगलादेशात गेल्या ५ महिन्यांत हिंदूंविरुद्ध ६४५ गुन्हे !
Venezuela Earthquake : १० सहस्र ते १ लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता
देवता, भारतमाता आणि राजकीय हुतात्मा यांच्या नावाने शपथ घेतली जाऊ शकत नाही ! – Kerala High Court