पंतप्रधान मोदी यांचे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभी विरोधी पक्षांना आवाहन !

नवी देहली – विरोधी पक्षांनी अलीकडच्या निवडणुकांमधील पराभवाच्या निराशेवर मात करावी आणि सभागृहात जोरदार सूत्रे उपस्थित करावीत. जर विरोधकांना इच्छा असेल, तर मी त्यांना कामगिरी कशी करावी ?, याचा सल्ला देण्यास सिद्ध आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभी विरोधी पक्षाला केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Speaking at the start of the Winter Session of Parliament. May the session witness productive discussions. https://t.co/7e6UuclIoz
— Narendra Modi (@narendramodi) December 1, 2025
पंतप्रधान मोदी म्हणाले की,
हे अधिवेशन पराभवाच्या निराशेचे किंवा विजयाच्या अहंकाराचे मैदान बनू नये. सदस्यांच्या नवीन पिढीने अनुभवाचा लाभ घ्यावा. नाटक करण्यावर नव्हे, तर भाषणबाजीवर भर दिला पाहिजे. घोषणाबाजीवर नव्हे, तर धोरणावर भर दिला पाहिजे.
गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज स्थगित !
मतदार सूचींचे ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ या विषयावरून विरोधी पक्षांनी लोकसभेत गदारोळ केल्याने प्रथम दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी २ वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले. ही प्रक्रिया मागे घेण्याची मागणी विरोध पक्षांकडून केली जात होती. (गेली अनेक वर्षे सातत्याने संसदेत आणि राज्यांच्या विधीमंडळात गदारोळ करण्यात येतो आणि त्यामुळे देशाची अब्जावधी रुपयांची हानी होते. तरीही त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना काढली जात नाही, हे जगातील मोठ्या लोकशाही देशाला लज्जास्पद ! – संपादक)
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !