
चेन्नई (तमिळनाडू) – श्रीलंकेत विद्ध्वंस घडवल्यानंतर ‘दितवाह’ चक्रीवादळ भारताच्या दिशेने वेगाने सरकत आहे. जवळची भारतीय राज्ये तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि पुद्दुचेरी यांच्या किनारी भागांत जोरदार वार्यासह मुसळधार पाऊस चालू आहे. यामुळे चेन्नईहून ५४ विमानांची उड्डाणे रहित करण्यात आली आहेत. पुद्दुचेरी केंद्रीय विश्वविद्यालयाने चक्रीवादळामुळे २९ नोव्हेंबरला सुटी घोषित करून सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. पुद्दुचेरी, कराईकल, माहे आणि यनम येथील सर्व शाळा अन् महाविद्यालये पुढील २-३ दिवस बंद रहातील.
श्रीलंकेत चक्रीवादळामुळे हाहा:कार !
श्रीलंकेत ‘दितवाह’ चक्रीवादळामुळे आलेला पूर आणि भूस्खलन यांमुळे १२३ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १३० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. गेल्या ३ दिवसांपासून कोलंबो विमानतळावर ३०० भारतीय प्रवासी अडकले आहेत. हे सर्व दुबईहून श्रीलंकामार्गे भारतात येणार होते.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
पावसाची उसंत : नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर दर्शनासाठी उघडले !
पंचमहाभूतांमधील असंतुलन : कलियुगातून सत्ययुगाकडे वाटचाल !
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती
मला अपकीर्त करा; पण महाराष्ट्राला करू नका ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.
संपादकीय : नियोजनाचा पराभव !