सांगली, सातारा, बारामती आदी ठिकाणांहून कामगारांची विशेष पथके सिंधुदुर्गात रवाना

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात वादळी वार्यासह पडलेल्या पावसामुळे वीज वितरण यंत्रणेची मोठी हानी झाली आहे. वीजवाहिन्यांचे खांब आणि ट्रान्सफॉर्मर (विद्युत् रोहित्र) अशा एकूण ६०० साहित्याची हानी झाली आहे. विशेषतः सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. दोडामार्ग तालुक्यातील ६२ गावे बाधित झाली असून काही भागांत गेल्या ८ दिवसांपासून वीज नाही. याविषयी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महावितरणची वीजपुरवठा सेवा सुरळीत करण्यासाठी सातारा, बारामती, सांगली आदी ठिकाणांहून कामगारांची विशेष पथके सिंधुदुर्गात पाठवली जाणार आहेत. यासाठीचे आवश्यक साहित्यही त्वरित उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील वीजवितरणाच्या सद्य:स्थितीविषयी मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्रा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आढावा घेतला. या बैठकीला ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महावितरणचे कोकण मंडलचे मुख्य अभियंता, सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक अभियंता आदी उपस्थित होते. या बैठकीत उपरोक्त निर्णय घेऊन तसे आदेश संबंधितांना देण्यात आले आहे.
कुडाळच्या नगरसेविका सौ. संध्या तेरसे यांचे आजपासून उपोषण
‘कॅप्टन ऑफ पोर्ट्स’ची यापुढे ‘गोवा मेरीटाइम बोर्ड’ म्हणून ओळख
पालकांचा कल सरकारी शाळांऐवजी अनुदानित आणि खासगी शाळांकडे
केवळ ओळखपत्रधारकांनाच मासेविक्रीची अनुमती ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
गोव्यात नोंदणीकृत श्री गणेशमूर्ती विक्रेत्यांपैकी २७ टक्के विक्रेते मूर्तीमध्ये १५ ते २० टक्के प्लास्टर ऑफ पॅरिस वापरतात !
सांगली जिल्हा बँक नोकर भरतीवरील स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाकडून रहित !