
‘सप्टेंबर २०२५ मध्ये माझी दुसरी मुलगी आमचा ३ वर्षांचा नातू ‘केशव’ याच्या समवेत आमच्याकडे आली होती. मी त्याला अंघोळ घालतांना आणि झोपवतांना श्री मुरलीधर स्वामीगळ यांनी गायलेला त्यांच्या सुपरिचित धूनमधील ‘हरे राम हरे राम, राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।’, हा महामंत्र म्हणत असे. केशवही माझ्या समवेत गात असे. २६.१०.२०२५ या दिवशी आम्हाला पुढील संदेश मिळाला, ‘सप्तर्षींच्या जीवनाडीपट्टीच्या वाचनानुसार सर्व साधकांनी प्रतिदिन १०८ वेळा ‘हरे राम हरे राम, राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।’, हा महामंत्र म्हणायचा आहे.’ ‘गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) पूर्वसूचना देऊन माझ्याकडून या महामंत्राचा जप पूर्वीपासून करवून घेतला’, हे माझ्या लक्षात आले आणि माझा भाव जागृत झाला. सप्तर्षींनी केलेल्या मार्गदर्शनानंतर मला या महामंत्राचा अर्थ चांगल्या प्रकारे समजला आणि मला तो भावपूर्णरित्या म्हणता येऊ लागला.

हा महामंत्र म्हणतांना मला पुढीलप्रमाणे चार वेगवेगळे भाव जाणवले. ‘हरे राम हरे राम’, असे म्हणतांना ‘मी भगवान श्रीरामाला मनःपूर्वक हाक मारत आहे’, असा माझा भाव असतो. ‘राम राम हरे हरे’, असे म्हणतांना ‘मी भगवान श्रीरामाची विनवणी करत आहे’, असा माझा भाव असतो. ‘हरे कृष्ण हरे कृष्ण’, असे म्हणतांना ‘भगवान प्रत्येकाची आणि प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहे’, याबद्दल माझ्या मनात अपार कृतज्ञतेचा भाव असतो. ‘कृष्ण कृष्ण हरे हरे’, असे म्हणतांना ‘भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमली संपूर्णपणे शरण गेले आहे’, असा माझा भाव असतो.
‘हे भगवंता, हे परात्पर गुरुदेवा, आम्ही त्रेतायुगातील भगवान श्रीरामाला आणि द्वापरयुगातील भगवान श्रीकृष्णाला पाहिले नाही; परंतु आम्ही तुम्हाला राम आणि कृष्ण या रूपांत पाहिले आहे. (सप्तर्षींच्या आज्ञेनुसार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या या पूर्वी झालेल्या एका जन्मोत्सवाच्या वेळी श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या रूपांत (वेशभूषेत) साधकांना दर्शन दिले होते.) ते पाहून आमच्या जीवनाचे सार्थक झाले. हे भगवंता, आमच्यासाठी तुम्हीच सर्वस्व आहात. आपल्या श्रीचरणी मी संपूर्ण शरणागतभावाने नमस्कार करत आहे.’
– (पू.) सौ. उमा रवीचंद्रन् (७० व्या समष्टी संत, वय ६० वर्षे), चेन्नई, तमिळनाडू. (२.११.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
यांसाठी मंदिरांचे सरकारीकरण नको !
१६ जुलै : सनातनचे संत पू. (कै.) रघुनाथ राणे यांची पुण्यतिथी
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !