
ही जाणीव असू द्या की, एखाद्याच्या पाठीमागे त्याची निंदा करणे, हे पाप होय. हे पाप कधीही करू नका. अशा गोष्टी ऐकणे, हेही महापाप आहे. मनामध्ये पुष्कळशा गोष्टी उद्भवतील; पण त्या सर्वच व्यक्त कराल, तर हळूहळू राईचा पर्वत बनेल. तुम्ही जर क्षमा कराल आणि विसरून जाल, तर सारे काही तिथेच समाप्त होऊन जाईल. जीवात्म्याचे निवासस्थान असलेले, हे शरीर कर्म करण्याचे एक अत्यंत उपयुक्त असे साधन आहे आणि जो माणूस, हे शरीर नरकतुल्य करतो, तो अपराधी आहे, तसेच जो माणूस शरिराची हेळसांड करतो, त्याची उपेक्षा करतो, तोही दोषास पात्र आहे. सिद्धी, चमत्कार इत्यादींसारख्या गूढ, रहस्यमय गोष्टींच्या पाठीमागे लागू नका, त्यांना मुळीच स्पर्श करू नका.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
भारताचा उद्धार होण्यासाठी…
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !