|
रायसेन (मध्यप्रदेश) – येथे २१ नोव्हेंबरला सलमान नावाच्या मुसलमान तरुणाने एका ६ वर्षांच्या मुलीला फसवून जंगलात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला जंगलात सोडून तो पसार झाला. ६ दिवसानंतरही त्याला अटक न झाल्याने २६ नोव्हेंबरला हिंदुत्वनिष्ठांचा उद्रेक झाला आणि त्यांनी पोलीस ठाण्यासमोर हिंसक आंदोलन केले. यामुळे पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. या प्रकरणी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आणि अधिकार्यांना कठोर शब्दांत फटकारले. तसेच रायसेनचे पोलीस अधीक्षक पंकज पांडे यांचे स्थानांतर केले आहे.

१. आरोप सलमान याने गुन्हा करण्याच्या ८ दिवस आधीच त्याचा भ्रमणभाष संच बंद केला होता. त्यामुळे ही घटना आधीपासून आखलेली असल्याचा संशय आहे. पीडित मुलीवर भोपाळच्या एम्स रुगणालयात उपचार चालू आहेत.
२. येथील मंडदीप परिसरातील गौहरगंज पोलीस ठाण्याबाहेर सलग ५ व्या दिवशी स्थानिक नागरिक, महिला आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना आंदोलन केले. त्यांनी आरोपीला ठार मारण्याची मागणी केली. सलमान यांची माहिती देणार्याला ३० सहस्र रुपये बक्षीस देण्याचे घोषित करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका
|

दौंड (पुणे) येथे नकली मद्य सिद्ध करणार्या चौघांना अटक !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !