मासिक वेतन २० लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या प्रवाशांना मद्य विकत घेता येणार

रियाध (सौदी अरेबिया) – इस्लामी देश सौदी अरेबिया ‘एम्.बी.एस्.’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजकुमार महंमद बिन सलमान यांच्या कारकीर्दीत अधिक पुरोगामी होत चालला आहे. सौदी अरेबिया ‘विजन २०३०’ अंतर्गत पर्यटनाचा मोठ्या प्रमाणात विकास करीत आहे. याचाच एक भाग म्हणून एकेकाळी मद्यावर मोठ्या प्रमाणात असलेली बंदी हळूहळू उठवण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी केवळ राजनैतिक अधिकार्यांना मद्य घेण्यास अनुमती देण्यात आली होती. आता ती प्रतिष्ठित सधन प्रवासी नागरिकांनाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकडे सौदी अरेबियाच्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे द्योतक म्हणून पाहिले जात आहे.
एकूणच कट्टर इस्लामी कायद्यामुंळे शेजारील संयुक्त अरब अमिरात, बहरीन आदी मुसलमान देशांच्या तुलनेत साऊदी अरेबियात पर्यटनाला विशेष चालना मिळत नव्हती. तथापि तेथील सरकारचे वर्ष २०३० पर्यंत प्रतिवर्षी १५ कोटी पर्यटकांना आकर्षित करण्याचे ध्येय आहे. यामुळे उच्च उत्पन्न गटातील व्यावसायिक आणि परदेशी गुंतवणूकदार यांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्यासाठी मद्यावरील बंदी उठवण्यात आली आहे. आता मासिक उत्पन्न ८० सहस्र रियालपेक्षा (साधारण २० लाख भारतीय रुपयांपेक्षा) अधिक असलेल्या किंवा विशिष्ट व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रवाशांना मद्य विकत घेता येणार आहे.
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण