इस्लामची चिकित्सा आवश्यक !

उच्चशिक्षित आतंकवादी

‘शिक्षण मिळाले नसल्याने आतंकवादी सिद्ध होतात’, हे ‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) पूर्वी चालवले जात होते; पण अनेक आतंकवादी उच्चशिक्षित निघाल्याने त्याला तडा गेला. आता एकच दुवा शिल्लक रहातो, तो इस्लामचा. गेली ५ दशके जगभरात सर्वोच्च १० आतंकवादी संघटना इस्लामपंथीय आहेत. तरीही वारंवार देहली बाँबस्फोटासारख्या घटना घडल्या, तरी त्याला ‘इस्लामी आतंकवाद’ म्हणण्याचे धाडस कुणी करत नाही.

इस्लाम जन्माला येण्यापूर्वी एकेश्वरवाद असलेले अनेक पंथ भारतात होते; पण कुठलाही पंथ किंवा पंथाचे ग्रंथ अन्य पंथियांना संपवण्याची भाषा करत नाही. इस्लामची चिकित्सा यादृष्टीने आता करणे आवश्यक आहे. ती जशी समाजातील विचारवंतांनी करणे आवश्यक आहे, त्याहीपेक्षा अधिक ती मुसलमानांनी करणे महत्त्वाचे आहे.

श्री. प्रसन्न बर्वे

‘आतंकवादी इस्लाममधूनच का सिद्ध होतात ?’, याचे उत्तर मुसलमानांना आता शोधावेच लागेल. अन्यत्र कुठेही महंमद यांचे नाव वापरले, तर लगेच पेटून उठणारा मुसलमान ‘जैश ए महंमद’ या आतंकवादी संघटनेने पैगंबरांचे नाव वापरून त्यांचा अपमान केला, असे म्हणत नाही; पण निदान आतातरी ही चिकित्सा मुसलमानांना करावी लागेल. ‘अल्पसंख्यांकांवर अन्याय होत आहे’, हे ‘व्हिक्टिम कार्ड’ (पीडित असल्याचे भासवून) खेळत बसणे थांबवावे लागेल. अल्पसंख्य तर पारशीही आहेत. त्यांना वाटत नाही आपल्यावर अन्याय होत आहे.

अन्यायाचे रडगाणे बंद करून न्याय्य दृष्टीने इस्लामची चिकित्सा आवश्यक आहे. आतंकवाद्यांना इस्लाम कळाला नाही कि तो विचारवंतांना कळाला नाही ?, याचीही उत्तरे शोधावी लागतील.

– श्री. प्रसन्न बर्वे, पणजी, गोवा. (१२.११.२०२५)