नुकताच सुरक्षा यंत्रणांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यात दिसणारी व्यक्ती आहे डॉ. उमर नबी ! हो, तोच इस्लामी आतंकवादी ज्याने १० नोव्हेंबरला देहलीला लाल किल्ल्याबाहेर एका गाडीत आत्मघातकी बाँबस्फोट घडवून आणला आणि १३ निरपराध लोक मेले, कित्येक घायाळ झाले. हा माणूस उच्चशिक्षित, सधन आणि चांगल्या रुग्णालयात नोकरी करत होता. या व्हिडिओमध्ये तो आत्मघातकी जिहादी आतंकवाद्यांना ‘ग्लोरिफाय’ (गौरव करणे) करत आहे, अल्लाने मान्य केलेली ‘शहादत’ (धर्मासाठी प्राणत्याग करणे) म्हणून सांगत आहे. या व्हिडिओमध्ये तो अतिशय थंडपणे सगळे बोलत आहे. त्याच्या चेहर्यावर कसले भाव नाहीत, त्याच्या स्वरात कसला कंप नाही. हे मानसिक विकृत व्यक्तीचे प्रलाप (अयोग्य विचार) नाहीत, ही आहे कट्टर इस्लामी आतंकवाद्यांची अधिकृत भाषा ! असे असले, तरी दोष एकट्या उमर नबीचा नाही, दोष आहे तो त्या विचारसरणीचा, त्या पुस्तकाचा, जी हिंसेला धर्माचे कवच देते आणि हिंसा करून निरपराध लोकांना मारणार्या व्यक्तीला स्वर्गाचे अन् सुंदर अप्सरांचे आमीष दाखवते. ज्या विचारसरणीतून उमर नबीसारखे लोक पुन्हा पुन्हा जन्माला येतात, तेही केवळ भारतात नाही, तर संपूर्ण जगात. गेली शेकडो वर्षे हे चालू आहे !

इस्लामी आतंकवाद ही एक विचारसरणी
‘ग्लोबल टेररिझम इंडेक्स (२०२४)’नुसार जगातील ७ मुख्य आतंकवादी संघटनांपैकी तब्बल ६ संघटना (इसिस, इसिस-खुरासान, बोको हराम, अल-शबाब, टीटीपी, अल-कायदा) स्वतःला अभिमानाने ‘इस्लामी’ म्हणवतात. गेल्या २० वर्षांत जगात झालेल्या झालेल्या सर्व आतंकवादी आक्रमणांपैकी तब्बल ९५ टक्क्यांहून अधिक आक्रमणे ही इस्लामी आतंकवादी आहेत. भारताचेच सांगायचे झाले, तर वर्ष २००१ ते वर्ष २०२३ या काळात देशात झालेल्या आतंकवादी आक्रमणांपैकी ७० टक्क्यांपेक्षा मोठी आतंकवादी आक्रमणे जिहादी संघटनांनी केली आहेत, बाकीची नक्षलवाद्यांनी; पण नक्षलवादी आता संपल्यात जमा आहेत. इस्लामी आतंकवाद मात्र भारतात केवळ जिवंतच नाही, तर तो जोमात वाढत आहे. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद, इंडियन मुजाहिदीन, हिजबुल नावे काहीही असोत, त्या मागची विचारसरणी एकच आहे. ही आकडेवारी कोणत्याही एकट्या व्यक्तीविषयी नाही. इस्लामी आतंकवाद ही एक पद्धत आहे, एक विचारसरणी आहे, जिच्यामागे एका धर्माचे अनुष्ठान आहे.

बहुसंख्य मुसलमान समाज जिहादचा निषेध का करत नाहीत ?
सर्वधर्मसमभावाची अफू खाऊन झिंगलेले अनेक तथाकथित ‘सेक्युलर’ (निधर्मी) लोक दावा करतात की, कट्टर मुसलमान थोडेच आहेत आणि सामान्य मुसलमानांना इस्लामी आतंकवादाशी काही देणे-घेणे नाही. ठीक आहे, आपण हे क्षणभर मान्य करूही की, उमर नबी, अन्सारुल्ला, साजिद आणि अनेक जिहादी मुसलमानांमध्ये अल्पसंख्य आहेत; पण मग बहुसंख्य मुसलमान समाज या विकृतीविरुद्ध मोठा, ठळक, सामूहिक निषेध करतांना का दिसत नाही ?
इस्लामी कट्टरवाद्यांसाठी ‘सेक्युलर’ हिंदू ‘काफिर’च !
बेगम सबा नकवी आणि जावेद अख्तर यांसारखे स्वघोषित ‘सेक्युलर’ मुसलमान प्रत्येक वेळी इस्लामी आतंकवादाचा स्पष्ट निषेध करण्याऐवजी ‘व्हॉटअबाऊटरी’चा (प्रत्यारोपाचा) आधार का घेतात ? सामान्य भारतीय मुसलमान रोहिंग्यांसाठी, गाझापट्टीसाठी; त्यांच्या प्रेषितांचा अपमान झाला, अशी शंका जरी आली, तरी ‘सर तन से जुदा’च्या (शिरच्छेदाच्या) घोषणा देत रस्त्यावर उतरतात. मग भारतावर इतकी इस्लामी आतंकवादी आक्रमणे झाली, तेव्हा हे लोक घरात शांत का बसतात ? या प्रसारित झालेल्या व्हिडिओत जी प्रवृत्ती दिसत आहे, तिचा अंतर्गत विरोध का होत नाही ? आणि ‘मेरा अब्दुल ऐसा नाही’ असे म्हणणार्या मूर्ख ‘सेक्युलर’ हिंदूंनो, इस्लामी कट्टरवाद्यांसाठी तुम्हीही ‘काफिर’च आहात. उमर नबीने आत्मघातकी आक्रमण करतांना कोण किती ‘सेक्युलर’ आहे, याची चाचपणी केली नव्हती. शेवटी कटू सत्य हेच आहे !
– सौ. शेफाली वैद्य, प्रसिद्ध व्याख्यात्या आणि लेखिका, पुणे. (१७.११.२०२५)
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari
जनतेचा पैसा अपात्र बहिणींना !