श्री. यशवंत अनंत सहस्रबुद्धे (वय ७१ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांना वाराणसी आश्रमात गेल्यावर शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहोत.

१. तीर्थक्षेत्री जाण्यासाठी साधकाने केलेल्या नियोजनाचा लाभ होणे
‘आम्ही कुटुंबीय ठरलेल्या दिवशी रेल्वेने वाराणसी आश्रमात पोचलो. वाराणसी आश्रमातील साधक श्री. गुरुराज प्रभु यांनी ‘परिस्थितीचा अभ्यास करून कोणत्या कोणत्या तीर्थक्षेत्री केव्हा जायला पाहिजे, म्हणजे त्रास न्यून होऊन देवाचे दर्शन सुलभ होईल’, याचे चांगले नियोजन केले होते. त्यांनी केलेल्या या नियोजनाचा आम्हाला पुष्कळ लाभ झाला.
२. साधक आरती भावपूर्ण म्हणत असल्याने वातावरण चैतन्यमय होणे
वाराणसी आश्रमात दिवसाचा आरंभ स्वच्छता आणि प्रभु श्रीरामाची पूजा यांपासून होतो. प्रभु श्रीराम, श्रीकृष्ण आणि मारुति यांची हिंदीतून आरती म्हटली जाते. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती होत होती. आरती म्हणणार्यांचाही भाव पुष्कळ होता. त्यामुळे आश्रमातील वातावरण चैतन्यमय झाल्याचे जाणवले.
समाजातील स्थिती पाहून ‘सनातनचा प्रत्येक आश्रम आणि सेवाकेंद्रे हीच खरी तीर्थक्षेत्रे आहेत’, याची जाणीव होणे

काशी, प्रयागराज आणि अयोध्या या तीर्थक्षेत्री गेल्यावर समाजातील बहुतांश व्यक्तींची मायेतील (पैशांच्या संदर्भातील) आसक्ती लक्षात आली. तेथील रिक्शावाले, दुकानदार, फुलवाले किंवा भिक्षा मागणारी व्यक्ती असो, प्रत्येक जण व्यावहारिक विचारांमध्ये अडकलेला असल्याचे आढळले. तीर्थक्षेत्री राहूनही त्यांना पैसा मिळवण्याव्यतिरिक्त कशाचेच महत्त्व वाटत नव्हते. त्यांची पवित्र तीर्थक्षेत्रांचा लाभ घेण्याची वृत्ती नव्हती, तसेच मला त्यांच्यात कुठेही भावभक्ती दिसली नाही. तेव्हा गुरुमाऊलींनी आपल्या ‘प्रत्येक साधकाला कसे घडवले आहे आणि साधकांची विचारप्रक्रिया कशी पालटली आहे !’, हे मला प्रकर्षाने जाणवले. ‘सनातन संस्थेचा प्रत्येक आश्रम आणि सेवाकेंद्रे हीच खरी तीर्थक्षेत्रे आहेत’, याची जाणीव आम्हा सर्वांनाच झाली.
– श्री. यशवंत अनंत सहस्रबुद्धे
३. वाराणसी आश्रम पाहून ‘जळगाव सेवाकेंद्रातही या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे’, याची जाणीव होणे
वाराणसी आश्रम पाहिल्यावर तेथील नीटनेटकेपणा, स्वच्छता, वाहनांची शुद्धी, तसेच उन्हाळ्यामध्ये वापरण्यासाठी स्वच्छ केलेले कूलर, त्यांची देखभाल आणि दुरुस्ती बघून मला स्वतःविषयी लाज वाटली. ‘मी जळगाव सेवाकेंद्रामध्ये या गोष्टींकडे किती अल्प लक्ष देतो !’, याची मला जाणीव झाली. त्या वेळी मी जळगाव सेवाकेंद्रात परतल्यानंतर मला प्रकृतीनुसार जमेल तितके आणि विचारून घेऊन वरीलप्रमाणे सेवा करण्याचे ध्येय घेतले.
४. वाराणसी आश्रमातील प्रत्येक साधकामध्ये साधना आणि सेवेची तळमळ अनुभवता येणे
अ. सौ. श्रेया प्रभु (वय ४८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) २० वर्षांपासून वाराणसी आश्रमात सेवा करत आहेत. त्या स्थिर आणि संयमी आहेत. प्रत्येक जण त्यांना विचारून त्यांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेतात. त्या प्रतिदिन रात्री दिवसभरातील सेवेचा निर्णय आणि सेवाकेंद्रातील प्रसंग यांचा आढावा सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांना देतात.
आ. वाराणसी आश्रमामध्ये स्वयंपाकघर आणि गृहव्यवस्थापन येथे सेवा करणार्या साधिका सेवा परिपूर्ण अन् भावपूर्ण करतात.
इ. वाराणसी आश्रमातील प्रत्येक साधक तळमळीने आणि साधनेच्या दृष्टीने विचार करून कृती करतात. साधक स्वतःकडून झालेल्या चुका फलकावर लिहिणे, आश्रमातील प्रत्येक ठिकाण स्वच्छ आणि सुंदर ठेवणे, त्यामध्ये येणार्या अडचणी विचारून घेणे, दायित्व असलेल्या साधकाने सांगितलेली सूत्रे सकारात्मक दृष्टीने घेऊन त्याप्रमाणे कृती करणे इत्यादी कृती करण्यासाठी प्रयत्नरत असतात.
ई. तेथे कुंभपर्वाच्या वेळी ग्रंथप्रदर्शनात लावण्यासाठी सिद्ध केलेले कापडी फलक, बसण्यासाठी असलेली आसने इत्यादी अनेक प्रकारचे साहित्य धुऊन, स्वच्छ करून आणि वाळवून त्यांचे मोजमाप करून ठेवल्याचे मला आढळले. ते सर्व साहित्य सुव्यवस्थित ठेवण्यासाठी प्रत्येक साधक धडपडत होता. यासाठी श्री. गुरुराज प्रभु (वय ४९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) साधकांचे योग्य नियोजन करत होते.
उ. सद्गुरु नीलेश सिंगबाळ गावाहून येण्यापूर्वी त्यांच्या ६ दिवसांच्या प्रसारसेवेचे नियोजन उत्तरदायी साधिका सौ. प्राची जुवेकरकाकू (वय ६१ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि अन्य साधकांनी मिळून केले. प्रत्येक जण या नियोजनामध्ये पुष्कळ तळमळीने आणि आनंदाने सहभागी होता.
सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी मार्गदर्शनात सांगितल्याप्रमाणे कृती केल्याने श्री. यशवंत अनंत सहस्रबुद्धे यांना पुष्कळ आनंद मिळणे

‘मी माझ्या कुटुंबियांच्या समवेत काशीधाम, प्रयागराज आणि अयोध्या नगरी या तीर्थक्षेत्री दर्शनाला जाण्याचे नियोजन केले होते. वाराणसी आश्रमात जाण्याच्या आदल्या दिवशी जळगाव सेवाकेंद्रात सद्गुरु जाधवकाकांचे मार्गदर्शन होते. सद्गुरु जाधवकाकांनी त्यांच्या मार्गदर्शनात ‘६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधकांनी पुढच्या टप्प्याला जाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी कशी बसवायची ?’, या दृष्टीने अनेक सूत्रे समजावून सांगितली आणि ती फळ्यावर लिहून ठेवली. त्या वेळी ‘मनात येणारा प्रत्येक सकारात्मक किंवा नकारात्मक विचार आपल्या नोंदवहीमध्ये टिपता आला पाहिजे. असे केल्याने आपले मन अंतर्मुख होऊन स्वभावदोष न्यून होतात’, हे महत्त्वाचे सूत्र देवाने माझ्या लक्षात ठेवायला सांगितले. या सूत्राचा परिणाम माझ्यावर वाराणसीला जाऊन जळगाव सेवाकेंद्रात परत येईपर्यंत टिकून होता. ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’, तसेच ‘गुणसंवर्धन अन् विचारण्याची वृत्ती’ या अंतर्गत अनेक सूत्रे नोंदवहीत नोंद करण्यासाठी देवाने मला सहकार्य केले. त्यामुळे ‘माझे मन पूर्वग्रहरहित आणि निर्विचार होण्यासाठी साहाय्य झाले’, असे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मला पुष्कळ आनंद मिळाला.’
– श्री. यशवंत अनंत सहस्रबुद्धे (वय ७१ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), जळगाव (१४.९.२०२५)
५. सद्गुरु नीलेश सिंगबाळ सत्संगात केवळ दृष्टीकोन देत नाहीत, तर साधकांचे कौतुकही करतात !
वाराणसी आश्रमात आठवड्यातून ३ दिवस साधकांसाठी चुकांचा सत्संग असतो. या सत्संगात स्वतःकडून झालेल्या चुका गांभीर्याने सांगायच्या असतात, तसेच स्वतःच्या लक्षात आलेल्या इतरांच्याही चुका लिहून त्या चुकांच्या पेटीमध्ये घालायच्या असतात. ही प्रक्रिया अखंड चालू असते. पुढे १५ दिवसांनी त्या पेटीतील सर्व चुका एकत्र केल्या जातात. त्यांपैकी गंभीर चुका सत्संगात घेतल्या जातात. सद्गुरु नीलेश सिंगबाळ त्यांवर योग्य दृष्टीकोन देऊन साधकांना त्यातून बाहेर काढतात. त्या वेळी सत्संगात सद्गुरु नीलेशदादा साधकांनी केलेल्या विशेष सेवेचे कौतुकही करतात. तेव्हा मला साधकांमधील उत्साह बघायला मिळाला.
६. ‘गुरुकार्याची तळमळ कशी असायला हवी ?’, हे शिकायला मिळणे
एकदा रामनाथी आणि देवद या आश्रमांत पाठवायच्या साहित्याचे नियोजन केले होते; पण एका सेवेसाठी वेळ न्यून पडत होता. तेव्हा ती सेवा वेळेत होण्यासाठी सौ. श्रेयाताईने सर्व साधकांना बोलावले आणि सर्वांकडून योग्य पद्धतीने ती सेवा पूर्ण करून घेतली. त्यानंतर सर्व साहित्याची बांधणी करून सर्व खोके घंटाभर आधीच वाहनामध्ये ठेवले.
या प्रसंगात ‘आश्रमातील कोणतीही प्रलंबित सेवा परिपूर्ण होण्यासाठी सर्व साधक एकत्रित येऊन किती उत्साहाने प्रयत्न करतात !’, हे मला शिकायला मिळाले.
७. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचे साधकांविषयी असलेले प्रेम !
पहाटे ४.१५ वाजता आम्हाला वाराणसी रेल्वेस्थानकातून गाडी होती; म्हणून रात्री २ वाजता परतीच्या प्रवासाला निघालो. सद्गुरु नीलेशदादा आम्हाला सोडण्यासाठी अर्धा घंटा आधीच येऊन थांबले होते. ‘भगवंताने सद्गुरु आणि संत यांना कसे घडवले आहे आणि ते प्रत्येक साधकाला रात्रंदिवस कसे साहाय्य करत असतात ?’, याची जाणीव होऊन गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त झाली.
मी गुरुदेव आणि सद्गुरु जाधवकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो. वाराणसी आश्रमातील साधकांनी दिलेले प्रेम आणि शिकायला मिळालेली सूत्रे यांची शिदोरी बरोबर घेऊन आलोे. ‘जळगाव सेवाकेंद्रात माझ्याकडूनही तशा कृती करून घ्याव्यात’, अशी मी गुरुदेवांच्या चरणी कळकळीची प्रार्थना करतो.’
– श्री. यशवंत अनंत सहस्रबुद्धे (वय ७१ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), जळगाव (१४.९.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !