‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतात. त्यातील मजकुरावर खुणा करून देतात. तो मजकूर कुठे वापरता येईल, हेही सांगतात, उदा. ग्रंथासाठी इत्यादी. पूर्वी ते दैनिकातील बातम्या वाचल्यावर त्यासंदर्भात ‘योग्य दृष्टीकोन काय असायला हवा ?’, हे लिहीत असत. त्यांना दैनिकात प्रसिद्ध झालेले लेख आवडतात, तेव्हा ते लिखाण करणार्यांचे कौतुक करून त्यांना प्रसाद पाठवून प्रोत्साहनही देतात. तसेच दैनिकात व्याकरण, वाक्यरचना, शब्द यांच्या चुका लक्षात आल्यास त्या चुका दाखवून देतात. अशा प्रकारे गत अनेक वर्षे त्यांची ही सेवा अव्याहतपणे चालू आहे. यात कधीही खंड पडलेला नाही. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चे अंक वाचून त्यावर खुणा करून दिल्यावर दैनिकातील स्पंदनांवर काय परिणाम होतात ?’, याचे संशोधन करण्यात आले. या संशोधनात्मक चाचण्यांसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ हे उपकरण आणि लोलक यांचा उपयोग करण्यात आला. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ आणि लोलक यांच्याद्वारे वस्तू, वास्तू अन् व्यक्ती यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मोजता येतात. हे संशोधन पुढे दिले आहे.
टीप – चाचणीस्थळी जागा अपुरी पडल्याने ३० मीटरपेक्षा अधिक असलेली प्रभावळ लोलकाने मोजण्यात आली आहे.

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून त्यावर खुणा करून दिल्यावर त्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे
या प्रयोगात १२.३.२०२४ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी खुणा करून दिलेला दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक आणि तुलनेसाठी त्याच दिवशीचा खुणा न केलेला दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यांच्या नोंदी पुढे दिल्या आहेत. या नोंदींतून लक्षात येते की, खुणा न केलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये मुळातच पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी खुणा करून दिलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकातील सकारात्मक ऊर्जा त्याहीपेक्षा पुष्कळ अधिक आहे.

२. समाजातील एक दैनिक आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी खुणा करून दिलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ यांचा तुलनात्मक अभ्यास
या प्रयोगात २३.१.२०२४ या दिवशीचे समाजातील एक दैनिक आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी खुणा करून दिलेले त्याच दिवशीचे दैनिक ‘सनातन प्रभात’ यांच्या चाचण्या करण्यात आल्या. दोन्ही दैनिकांमध्ये एकाच विषयावरील लिखाण प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या नोंदी पुढे दिल्या आहेत. यातून लक्षात येते की, समाजातील दैनिकात प्रसिद्ध झालेल्या लिखाणात अधिक प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आणि अत्यल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी खुणा करून दिलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधील तशाच प्रकारच्या लिखाणात पुष्कळ अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली.

३. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लिखाणावर
केलेल्या खुणांनुसार दैनिकातील स्पंदनांमध्ये पालट होतात का ?’, या संदर्भातील संशोधन या प्रयोगात सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ‘आवडले’ किंवा ‘खूप चुका’ अशा खुणा केलेल्या दैनिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तुलनेसाठी त्याच दिवशीच्या खुणा न केलेल्या अंकांच्याही चाचण्या करण्यात आल्या. त्यांच्या नोंदी पुढे दिल्या आहेत. ‘आवडले’ अशा खुणा केलेल्या दैनिकातील सकारात्मक ऊर्जेत ५४७० मीटरने वाढ झाली आहे. ‘खूप चुका’ अशा खुणा केलेल्या दैनिकात २०० मीटरने वाढ झाली आहे. यातून लक्षात येते की, सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लिखाणावर केलेल्या खुणांनुरूप दैनिकातील स्पंदनांमध्ये पालट होतात.

४. दैनिक ‘सनातन प्रभात’ची सात्त्विकता, तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत असणे
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २०२१ ते २०२४ पर्यंतच्या काही निवडक अंकांच्या चाचण्या केल्या. त्यांच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.

वरील नोंदींतून पुढील सूत्रे लक्षात येतात.
४ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’ची सात्त्विकता दिवसेंदिवस वाढत असणे : वर्ष २०२१ मध्ये दैनिकातील सकारात्मक ऊर्जा ९०० मीटर होती. वर्ष २०२४ मध्ये ती २३०० मीटर आहे; म्हणजे ३ वर्षांत तिच्यात पुष्कळ वाढ झाली आहे.
४ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत असणे : वर्ष २०२१ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी खुणा केलेल्या दैनिकातील सकारात्मक ऊर्जा ११६० मीटर होती, म्हणजे तिच्यात २६० मीटरने वाढ झाली आहे. वर्ष २०२४ मध्ये अंकातील सकारात्मक ऊर्जा ४७०० मीटर आहे; म्हणजे तिच्यात २४०० मीटरने वाढ झाली आहे. यातून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत गेले आहे. याचा सकारात्मक परिणाम त्यांनी वाचलेल्या अंकांवर झाला आहे’, असे लक्षात येते.
५. चाचण्यांतील नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

५ अ. एखाद्या दैनिकातून प्रक्षेपित होणारी स्पंदने विविध घटकांवर अवलंबून असणे : एखाद्या दैनिकातून प्रक्षेपित होणारी स्पंदने विविध घटकांवर अवलंबून असतात, उदा. दैनिकाचा उद्देश, त्यातील लेखांचे विषय आणि त्यांची मांडणी, दैनिकाची भाषा अन् लिपी, लेखांचे व्याकरण आणि संकलन, लेखक अन् संपादक यांची आध्यात्मिक पातळी आणि त्यांना आध्यात्मिक त्रास असणे किंवा नसणे, तसेच दैनिकाच्या संदर्भात विविध टप्प्यांवर केल्या जाणार्या कृती, उदा. त्यातील वृत्तांचे टंकलेखन, संकलन अन् मुद्रितशोधन, विज्ञापनांची संरचना इत्यादी. थोडक्यात हे सर्व घटक जेवढे सात्त्विक असतील, तेवढे त्या दैनिकातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे प्रमाण अधिक असते. या स्पंदनांचा परिणाम वाचकांवर होतो.
५ आ. दैनिक ‘सनातन प्रभात’मधून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे कारण : ‘दैनिक ‘सनातन प्रभात’चे ध्येय हे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृतीचे आहे. दैनिकातून राष्ट्र अन् धर्म यांच्या संदर्भातील मार्गदर्शक लेख प्रसिद्ध केले जातात. ‘समाजाला काय आवडते, याऐवजी समाजासाठी काय आवश्यक आहे’, याचा विचार केला जातो. दैनिक ‘सनातन प्रभात’ भाषाशुद्धीला महत्त्व देते; कारण भाषा जेवढी शुद्ध तेवढी चांगली स्पंदने प्रक्षेपित होतात. दैनिकात संस्कृत सुभाषिते, श्लोक, संतांची सुवचने इत्यादी प्रसिद्ध केली जातात. यामुळे दैनिकाच्या सात्त्विकतेत मोलाची भर पडते. दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करणारे सर्वजण साधक आहेत. ते दैनिकाशी संबंधित प्रत्येक गोष्ट त्यांची साधना म्हणून करतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी आरंभीपासूनच साधकांना साधनेचे योग्य दृष्टीकोन देऊन प्रत्येक सेवा परिपूर्ण करण्यास शिकवले. आजही ते साधकांना याविषयी तळमळीने मार्गदर्शन करत आहेत. थोडक्यात सांगायचे तर, दैनिक ‘सनातन प्रभात’चा उद्देश, तसेच दैनिकाशी संबंधित सर्व घटक सात्त्विक आहेत. त्यामुळे दैनिक ‘सनातन प्रभात’मधून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात.
५ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चे अंक वाचून त्यांवर खुणा करून दिल्यानंतर त्या अंकातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढण्याचे कारण : सर्वसाधारणत: दैनिकातील स्पंदनांचा परिणाम त्याचे वाचन करणार्याचे मन आणि बुद्धी यांच्यावर होत असतो. येथे विशेष लक्षात घेण्याचे सूत्र म्हणजे संतांमधील (सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांमधील) चैतन्याचा सकारात्मक परिणाम त्यांनी वाचन केलेल्या अंकांवर झाला आहे. याचे कारण हे की, सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर हे अत्युच्च पातळीचे समष्टी संत असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य आहे. ते प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’चे अभ्यासपूर्ण वाचन करतात. ते दैनिकातील उपयुक्त लिखाण, तसेच चुकाही त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरात खुणा करून देतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची चैतन्यमय दृष्टी, त्यांचे चैतन्यमय हस्ताक्षर आणि वाचन करतांना त्यांचा झालेला चैतन्यमय हस्तस्पर्श यांमुळे अंक चैतन्याने भारित होतात.
थोडक्यात, ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ची सात्त्विकता, तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत गेले आहे’, हे या संशोधनातून लक्षात येते.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.१.२०२५)
ई-मेल : [email protected]
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !