चीनची जपानला धमकी !

बीजिंग (चीन) : जपानने तैवानमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी सैन्य शक्तीचा मार्ग निवडला, तर त्याचे परिणाम अत्यंत गंभीर असतील आणि त्याला चिनी सैन्याच्या कठोर प्रत्युत्तरास सामोरे जावे लागेल, अशी धमकी चीनच्या संरक्षण मंत्रालयाने जपानला दिली. यानंतर जपानमधील चीनच्या राजदूताला सरकारने बोलावून या विधानाविषयी कठोर आक्षेप नोंदवला.
काय म्हणाल्या होत्या जपानच्या पंतप्रधान ?![]() जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची यांनी गेल्या आठवड्यात संसदेमध्ये बोलतांना ‘तैवानवरील संभाव्य चिनी आक्रमण जपानच्या अस्तित्वासाठी धोका ठरू शकते आणि त्याला जपानकडून सैनिकी उत्तर मिळू शकते’, असे विधान केले होते. जपानमधील ओसाका येथील चीनचे महावाणिज्यदूत झू जियान यांनी या वक्तव्यानंतर एका बातमीची लिंक सामाजिक माध्यमांतून प्रसारित करून अत्यंत कठोर टिपणी केली होती. वाद वाढल्यानंतर त्यांनी ती हटवली. |
जपानने चिनी राजदूताला बोलावून निषेध नोंदवला !
जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या टिपणीला अत्यंत अनुचित ठरवून जपानमधील चिनी राजदूताला बोलावले आणि कठोर निषेध नोंदवला. काही वरिष्ठ जपानी नेत्यांनी तर संबंधित चिनी अधिकार्याच्या निष्कासनाची मागणी केली आहे.
चीनकडून जपानी राजदूताकडे निषेध नोंदवला
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बीजिंगमधील जपानी राजदूताला बोलावून पंतप्रधान ताकाइची यांच्या विधानावर कठोर आक्षेप नोंदवला.

Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman