Pakistan Taliban Conflict : पाकवर आक्रमण करण्यासाठी तालिबान करत आहे ६०० मानवी बाँबची सिद्धता !

काबुल (अफगाणिस्तान) – तालिबान सरकार पाकिस्तानविरुद्ध आत्मघाती आक्रमण करण्यासाठी ६०० हून अधिक तरुणांना प्रशिक्षण देत आहे. हे आत्मघाती लोक काबुल विद्यापीठ आणि इतर शैक्षणिक संस्था यांमधून भरती केले जात आहेत. या तरुणांमध्ये मोठ्या संख्येने उच्चशिक्षित विद्यार्थी आहेत, ज्यांना पाकिस्तानमधील सैनिकी आणि सामरिक लक्ष्य यांवर आक्रमण करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे.

पाकिस्तानी वृत्तसंस्थांच्या वृत्तानुसार अटक केलेला तालिबानी आतंकवादी नैमतुल्ला याने चौकशीत मान्य केले की, त्याला कंदहारहून आणले होते आणि पाकिस्तानमध्ये आक्रमणांसाठी प्रशिक्षण दिले होते. काही तालिबानी गट विद्यापिठांमधील धार्मिक गट आणि अभ्यास मंडळ यांद्वारे विद्यार्थ्यांना कट्टरतावादी बनवत आहेत.