‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या संदर्भात कर्नाटक राज्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव या निमित्ताने १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यातील फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पार पडला. या वेळी आलेल्या कर्नाटक राज्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती येथे दिल्या आहेत. (भाग १)

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. श्रीमती गीता महाले, कुमटा, उत्तर कन्नड.

१ अ. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त सहभागी झाल्यावर जीवनातील अनेक संकटांचे निवारण होणे : ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त सहभागी होण्याची संधी मिळणे, हे माझ्या पूर्वजन्मांतील पुण्याचेच फळ आहे. प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मला धन्वन्तरि याग प्रत्यक्ष पहाण्याचे भाग्य मिळाले. या यागासाठी भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांतून साधूसंत उपस्थित राहिले होते. जसा घोर अंधकार केवळ एक दीप लावून दूर होतो, तसेच गुरुदेवांच्या अपार कृपेने आमच्या जीवनातील अनेक संकटांचे निवारण होऊन आम्हाला गुरुदेवांनी शांतीची अनुभूती दिली.

१ आ. ‘सनातन धर्म’ महान असून या धर्मात जन्म होणे’, ही भाग्याची गोष्ट असणे : आम्ही भव्य ध्वजारोहण सोहळ्याचे साक्षीदार झालो. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त आम्ही अनेक संत आणि सद्गुरु यांचे मार्गदर्शन ऐकले. तेव्हा ‘सनातन धर्म ’ किती महान आहे आणि या धर्मात जन्म होणे, ही किती भाग्याची गोष्ट आहे !’,  हे आमच्या लक्षात आले.’

२. कु. चित्र टांडेळ, होन्नावर, उत्तर कन्नड. 

२ अ. ‘दुर्गादेवी धर्मयुद्ध करून हिंदु राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी अवतरली आहे’, असे जाणवणे आणि ‘हिंदु राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणासाठी करण्यात आलेला एक ‘दिव्य महायाग’असणे : ‘शतचंडी यागाच्या ठिकाणी मला श्री दुर्गादेवीचे दर्शन झाले. त्या वेळी मला देवीच्या मस्तकावर त्रिशूळ, कमळ आणि कासव दिसले. तेव्हा ‘दुर्गादेवी धर्मयुद्ध करून हिंदु राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी अवतरली आहे’, असे मला जाणवले. या अनुभूतीवरून ‘हा शतचंडी याग केवळ एक साधारण धार्मिक याग नव्हता, तर ‘हिंदु राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी करण्यात आलेला एक ‘दिव्य महायाग’ होता’, असे माझ्या लक्षात आले.’

(क्रमशः)

(सर्व सूत्रांसाठी दिनांक : २३.९.२०२५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • अनुभूती : येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/973640.html