गोव्यात आलेल्या पुरोहितांनी रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर दिलेले अभिप्राय !

 १. श्री. प्रशांत प्रकाश रामदासी, बार्शी, जि. सोलापूर : ‘उत्तम ईश्वरी अनुभूती देणारा अनुभव ! ईश्वरप्राप्तीसाठी लागणार्‍या इच्छाशक्तीमध्ये उत्साह जाणवला.’

२. श्री. संदीप चंद्रकांत जोशी, बाळे, जि. सोलापूर : ‘आश्रमात आल्यावर ‘देवळात आल्यासारखे जाणवले.’

३. श्री. अमर दिलीप पुराणिक, निगडी, कोरेगाव, जि. सातारा : ‘धर्मजागृतीसाठी आपल्या आश्रमाकडून जे कार्य चालू आहे, ते आम्हाला इथे आल्यानंतर पहावयास मिळाले. ते अतिशय छान आहे, स्वत:ही धर्मकार्यात काहीतरी स्तुत्य कार्य करावे ही जागृती झाली. ’

४. श्री. ऋषभ उल्हास पुराणिक, कोरेगाव, जि. सातारा : ‘आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर उत्तम अशी सात्त्विक अनुभूती अनुभवण्यास मिळाली. आश्रमामुळे माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी नक्कीच साहाय्य होईल.’

 ५. श्री. धर्मराज प्रकाश जोशी, कोरेगाव, जि. सातारा : ‘आश्रमात आल्यानंतर ‘हिंदु धर्म’ जपणे आणि त्याची जनजागृती कशी होऊ शकते’, हे पहाण्यास मिळाले. ‘ईश्वरीय अनुभूती म्हणजे काय ?’, याचे साक्षात् दर्शन झाले.’

(सर्व सूत्रांचा दिनांक २२.९.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक