मुंबई, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – ७ नोव्हेंबर २०२५ या दिवशी ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. ‘वन्दे मातरम्’च्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात सामूहिक गान, वक्तृत्व स्पर्धा, परिसंवाद, निबंध स्पर्धा, प्रदर्शन आदी विविध प्रकारे पुढील वर्षभर ‘वन्दे मातरम्’चा जागर केला जाणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने याविषयीचा नियोजित कार्यक्रम देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना पाठवला आहे. ७ नोव्हेंबर २०२५ ते ७ नोव्हेंबर २०२६ या वर्षभरात देशभरात ‘वन्दे मातरम्’चा वर्धापनदिन साजरा केला जाणार आहे.
महाराष्ट्रात वर्षभर राबवण्यात येणार्या कार्यक्रमासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. संपूर्ण वर्षभरात ४ टप्प्यांत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. ७ नोव्हेंबर २०२५ या दिवशी देशभरातील प्रमुख प्रतिष्ठित नागरिकांसह ‘वन्दे मातरम्’चे सामूहिक गायन केले जाणार आहे. शाळांमध्ये ‘वन्दे मातरम्’ला समर्पित विशेष सभा, भित्तीपत्रक, ‘वन्दे मातरम्’चे गायन करून माध्यमांवर अपलोड करणे, निबंध स्पर्धा आदी विविध प्रकारे महाराष्ट्रात ‘वन्दे मातरम्’चा जागर होणार आहे.
‘वन्दे मातरम्’चा इतिहास !![]() बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची ‘आनंदमठ’ ही कादंबरी मालिका स्वरूपात प्रकाशित झाली. यातील ‘वन्दे मातरम्’ हे गीत ७ नोव्हेंबर १८७५ या दिवशी म्हणजे अक्षय नवमीच्या दिवशी लिहिले गेल्याचे मानले जाते. १८९६ मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात ‘वन्दे मातरम्’ गायले. त्यानंतर काँग्रेसच्या बैठकीत ‘वन्दे मातरम्’चे पहिले २ श्लोक गाण्यास प्रारंभ झाला. पुढे या गीताने भारतियांच्या हृदयात स्थान प्राप्त केले. वर्ष १९०५ मध्ये बंगालच्या फाळणीविरुद्धच्या निषेधाचा ‘वन्दे मातरम्’ हा घोष झाला. वर्ष १९०७ मध्ये मादाम भिकाजी कामा यांनी भारताबाहेर बर्लिन देशात प्रथमच ‘वन्दे मातरम्’ लिहिलेला तिरंगा ध्वज फडकवला. २४ जानेवारी १९५० या दिवशी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेत स्वातंत्र्यलढ्यातील योगदान लक्षात घेऊन ‘वन्दे मातरम्’ गीताला राष्ट्रगीताप्रमाणे दर्जा द्यावा आणि या गीताचा राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान द्यावा, असे निवेदन केले. असे ‘वन्दे मातरम्’ गीताचे ऐतिहासिक महत्त्व आहे. |

न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा