(म्हणे) ‘भारत अफगाणिस्ताला नियंत्रित करत आहे !’ – Pakistan Defence Minister

पाक-तालिबान चर्चा फिस्कटल्यावर पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचा पुन्हा भारताला लक्ष्य करत आरोप

पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – काबुलमध्ये बसलेले लोक कठपुतळीचे खेळ करतात आणि त्यांना देहली नियंत्रित करते. भारत त्याची पश्चिम सीमा काबुलच्या माध्यमातून संतुलित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि काबुल त्यासाठी वापरला जात आहे. जर काबुलने इस्लामाबादवर आक्रमण केले, तर पाकिस्तान ५० पट अधिक कडक उत्तर देईल, अशी धमकी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तानवर आरोप करत दिली आहे. पाक आणि अफगाणिस्तान यांच्यातील युद्धबंदीची चर्चा फिस्कटल्यानंतर त्यांनी वरील आरोप करत धमकी दिली.

१. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानने अफगाणिस्तानधील ‘तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’च्या तळांवर आक्रमण करण्याची अनुमती मागितली होती; मात्र तालिबान सरकारने ती नाकारली. यानंतर ही चर्चा फिस्कटली. पाकने हे मान्य केले की, त्याने अमेरिकी ड्रोनद्वारे आक्रमण करण्याची अनुमती मागितली होती. त्यावर तालिबानने अमेरिकी ड्रोनला अनुमती देण्यास नकार दिला.

२. अफगाण सूत्रांनी चेतावणी दिली की, भविष्यात पाकिस्तानने जर आक्रमण केले, तर त्यावर प्रत्युत्तर दिले जाईल. इस्लामाबादला लक्ष्य केले जाईल. (छोटा अफगाणिस्तान पाकला धमकी देऊ शकतो, तर भारताने पाकला कायमचे नष्ट करणे अपेक्षित आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

जर भारत अफगाणिस्तानातील सरकारला नियंत्रित करून पाकला धडा शिकवत असेल, तर भारतियांना त्याचे कौतुकच वाटेल !