आज माझ्यावर जी वेळ आली आहे, तीच उद्या तुमच्यावर येऊ शकेल !

७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हमासच्या आतंकवाद्यांनी ‘सिमहत तोराह’ या यहुदी धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जमलेल्या ज्यू नागरिकांवर आक्रमण केले. या दिवशी हमासने केलेले हत्याकांड, या आतंकवादाचे उदात्तीकरण करण्याची अस्वस्थ करणारी केरळची मानसिकता, प्रत्यक्षदर्शी दाखल्यांचा शोध घेणे, प्रसारमाध्यमांमधील पूर्वग्रह आणि या घटनेची काश्मीरमधील घटनांशी ऐतिहासिक समानता या सूत्रांचा या लेखात ऊहापोह करण्यात आला आहे.

२७ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखात आपण ‘केरळमध्ये हमासचे होत असलेले उदात्तीकरण चिंताजनक, इस्रायली नागरिकांच्या बदल्यात ५ सहस्र पॅलेस्टिनी आतंकवाद्यांच्या सुटकेची हमासची मागणी, मिला १८’ या कादंबरीत जर्मन सैन्याने संपूर्ण ज्यू समुदायाची अमानुषपणे कत्तल केल्याचा उल्लेख, हमासच्या आतंकवाद्यांनी केलेला नरसंहार आणि भारतीय प्रसारमाध्यमांनी केलेली दिशाभूल आणि हमासच्या बंदिवासातून शेवटची इस्रायली व्यक्ती मुक्त होईपर्यंत सैन्य कारवाई चालू ठेवण्याचा इस्रायलचा निर्धार’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/970747.html

इस्रायल आणि हमास युद्धाचे संग्रहित छायाचित्र

१०. काश्मिरी हिंदु आणि इस्रायली नागरिक यांच्यावरील अत्याचारांत साम्य

वर्ष १९८० च्या दशकाच्या आरंभी काश्मीरमध्ये जे घडले, त्यात आणि या घटनेत साम्य आहे. जेव्हा ‘जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट’च्या आतंकवाद्यांनी, ज्या पंडितांनी त्यांची जन्मस्थाने सोडण्यास अनिच्छा दर्शवली, त्यांची कत्तल केली. हे ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटामध्ये चित्रित करण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये काश्मिरी हिंदूंनी त्यांच्या स्वतःच्या राज्यातून भारतातील अन्य ठिकाणी पलायन केल्याची वास्तविक कथा दर्शवली आहे. काश्मिरी हिंदु त्यांच्याच देशात निर्वासित झाले; कारण मुसलमानांनी त्यांना पूर्णपणे बाहेर काढळे. वर्ष १९८५ ते १९९९ या काळात पंडितांचे सामूहिक पलायन झाले आणि ज्यांनी जाण्यास विरोध केला, त्यांची भीषण पद्धतीने कत्तल करण्यात आली. काश्मीरला पाकिस्तानात विलीन करण्याची पूर्वतयारी म्हणून काश्मीरच्या इस्लामीकरणासाठी अहोरात्र काम करत ‘नॅशनल कॉन्फरन्स’ आणि ‘पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षा’च्या वरिष्ठ नेतृत्वाच्या संगनमताने इस्लामी आतंकवाद्यांनी गरीब हिंदूंना कसे ठार मारले ? ते या चित्रपटात दाखवले आहे.

११. हमासच्या आक्रमणातील प्रत्यक्षदर्शींचे अनुभव

पेन्झेलने केवळ ‘झाका’ स्वयंसेवकांच्या अनुभवाचे वर्णन केलेले नाही. जे हमासच्या आक्रमणातून बचावले; परंतु ज्यांनी त्यांच्या प्रियजनांना स्वतःच्या डोळ्यांसमोर गमावले, त्यांच्याशी संवाद साधला. गाय बेन शिमोन, एक संगीतकार आणि इटामार जोसेफ (वय २६ वर्षे), एक कला शाखेतील विद्यार्थी हे ‘ब्लॅक सब्बाथ’च्या संगीत कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोव्हा येथे आले होते. त्यांनी जे पाहिले त्या धक्क्यातून आणि आघातातून ते अद्याप सावरलेले नाहीत. इटामार जोसेफ म्हणाले, ‘‘हमासच्या आतंकवाद्यांपैकी एकाने आमच्यावर ‘आर्.पी.जी. (रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड)’ क्षेपणास्त्र सोडले. त्या वेळी लोक हवेत उडाले. एक माणूस पूर्णपणे उडाला आणि त्याचे अवयव सर्वत्र फेकले गेले. माझ्या डोक्यालाही पुष्कळ जोरात मार लागला.’’ इटामारने अनुभवलेल्या अनेक घटनांपैकी ही एक घटना आहे. शिमोन त्याच्या मैत्रिणीसह कार्यक्रमाला आला होता आणि तो वगळता अन्य सर्वजण आतंकवाद्यांनी उडवलेल्या क्षेपणास्त्रांना आणि गोळ्यांमुळे मृत्यूमुखी पडले.

१२. मानवतेचा आदर करणार्‍यांनी एलोन पेन्झेल याचे पुस्तक अवश्य वाचावे !

टेस्टीमनीज विदाऊट बाऊंड्रिज

एलोन पेन्झेल हा जागतिक दर्जाचा लेखक आहे, असे मी म्हणणार नाही; परंतु त्याने जे लिहिले आहे, त्या त्याच्या उत्स्फूर्त भावना आणि शब्द आहेत. तो ज्यांच्याशी बोलला त्यांच्या आठवणींमधून त्याने हे व्यक्त केले आहे. पीडितांच्या धक्क्याने आणि दुःखाने पेन्झेल याच्या दुःखात भर घातली आहे. या दुःखावर तो नियंत्रण ठेवू शकत नव्हता. त्याचा परिणाम म्हणून ‘टेस्टीमनीज विदाऊट बाऊंड्रिज’ हे पुस्तक त्याने लिहिले. त्याने जे लिहिले, ते मानवतेचा आदर करणार्‍या सर्वांनी वाचणे अत्यावश्यक आहे.

१३. केरळमधील ‘गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन’चा हमासला पाठिंबा

श्री. कुमार चेल्लपन

मी हे पुस्तक वाचत असतांनाच वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांनी माझे लक्ष वेधून घेतले. जमात-ए-इस्लामीद्वारे अर्थसाहाय्य देऊन प्रायोजित केलेल्या ‘गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन’ (जीआयओ) नावाच्या संघटनेने सुमारे १०० मुलींना बुरखा परिधान करून मडायिप्पारामध्ये नेले. मडायिप्पारा ही भूमी ‘मलबार देवस्वम् मंडळा’च्या मालकीची असून त्याला जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र (हॉट स्पॉट), तसेच सनातन धर्माच्या अनुयायांसाठी धार्मिकदृष्ट्या पवित्र स्थान आहे. मुसलमान मुलींच्या या संघटनेचा यामागे हेतू कोणता होता ? तर इस्रायल आणि पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना ‘गरीब अन् निष्पाप’ अशा हमासच्या स्वातंत्र्यसैनिकांवर (आतंकवाद्यांवर) आक्रमण करण्यापासून सावध करणे. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाही केली, ज्यामुळे परिसरातील समुदायांमध्ये द्वेष निर्माण होऊ शकतो. सुदैवाने मडायिप्पाराच्या परिसरामध्ये रहाणार्‍या रहिवाशांना समजल्या नाहीत; कारण त्या घोषणा इंग्रजीत होत्या.

भारताच्या किनार्‍यापासून ३ सहस्र किमी अंतरावर झालेल्या एखाद्या देशाच्या संघर्षाला कुणी महत्त्व का द्यावे ? असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. याविषयी एक जुनी म्हण आहे, ‘आज माझ्यावर जी वेळ आली आहे, तीच उद्या तुमच्यावर येऊ शकेल !’

– श्री. कुमार चेल्लप्पन, ज्येष्ठ पत्रकार, केरळ.