७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हमासच्या आतंकवाद्यांनी ‘सिमहत तोराह’ या यहुदी धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जमलेल्या ज्यू नागरिकांवर आक्रमण केले. या दिवशी हमासने केलेले हत्याकांड, या आतंकवादाचे उदात्तीकरण करण्याची अस्वस्थ करणारी केरळची मानसिकता, प्रत्यक्षदर्शी दाखल्यांचा शोध घेणे, प्रसारमाध्यमांमधील पूर्वग्रह आणि या घटनेची काश्मीरमधील घटनांशी ऐतिहासिक समानता या सूत्रांचा या लेखात ऊहापोह करण्यात आला आहे.
लेखक : श्री. कुमार चेल्लप्पन, ज्येष्ठ पत्रकार, केरळ.

१. केरळमध्ये हमासचे होत असलेले उदात्तीकरण चिंताजनक
केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या संस्थेने विविध सांस्कृतिक आणि सामाजिक मेळावे आयोजित केले जात असलेल्या ठिकाणी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात तेथील स्थळांना दिलेली नावे आश्चर्यचकित करणारी होती. हमास या नावाने अधिक कुप्रसिद्ध असलेल्या पॅलेस्टाईनच्या कथित स्वातंत्र्यसैनिकांना (आतंकवाद्यांना) असलेल्या पाठिंब्याचे प्रदर्शन म्हणून या स्थळांना ‘पॅलेस्टाईन’, ‘रामल्ला’, ‘जेरुसलेम’, ‘इंतिफादा’ आणि ‘गाझा’ अशी नावे देण्यात आली होती. हमासच्या आतंकवाद्यांनी ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी गाझा पट्टी आणि इस्रायल दरम्यानच्या सीमावर्ती भागात १ सहस्रहून अधिक ज्यू लोकांची कत्तल केली. इस्रायलचे संरक्षण दल (इस्रायल डिफेन्स फोर्सेस), महिला, मुले आणि लढणारे पुरुष यांच्यासह २५० हून अधिक इस्रायली नागरिकांचे हमासच्या आतंकवाद्यांनी अपहरण केले होते, असे म्हटले जाते.
२. इस्रायली नागरिकांच्या बदल्यात ५ सहस्र पॅलेस्टिनी आतंकवाद्यांच्या सुटकेची हमासची मागणी

काही जागतिक वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केलेल्या दृश्यांमध्ये इस्रायली महिलांचे कपडे उतरवलेले, त्यांच्यावर बलात्कार केलेले आणि त्यांना अत्यंत भीषण पद्धतीने गोळ्या घातलेल्या स्थितीत दाखवण्यात आले. अपहरण करून ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांच्या बदल्यात इस्रायलने त्याच्या कह्यात असलेल्या ५ सहस्रांहून अधिक पॅलेस्टिनी आतंकवाद्यांची सुटका करावी, अशी मागणी हमासच्या आतंकवाद्यांनी केली. हमासने इस्रायली नागरिकांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवणे, हे सर्व देश काळजीपूर्वक पाळत असलेल्या आंतरराष्ट्रीय कायद्यांचे हे उल्लंघन होते.
३. इस्रायलवर झालेल्या आतंकवादी आक्रमणांना प्रसिद्धी न देणारी भारतातील प्रसिद्धीमाध्यमे
इस्रायली गुप्तचर संस्थांना हमासच्या षड्यंत्राचा अंदाज लावण्यात अपयश आल्याने जगाला आश्चर्य वाटले आणि धक्का बसला. बहुतांश ओलिसांची कत्तल आणि सामूहिक नरसंहार झाल्यानंतरच इस्रायलच्या संरक्षण दलाला वास्तवाची जाणीव झाली; पण तोपर्यंत पुष्कळ हानी झाली होती. सर्वसाधारणपणे भारतात आणि विशेषतः केरळमध्ये एक मनाला अस्वस्थ करणारा कल माझ्या लक्षात आला आहे. इस्रायल ज्या आतंकवादाने पीडित झाला आहे, त्याची प्रसिद्धी भारतीय प्रसारमाध्यमे करत नाहीत. काही प्रमाणात इस्रायल सर्व प्रकारचा आतंकवाद आणि क्षेपणास्त्रांचे आक्रमण यांचा शांतपणे सामना करतो अन् प्रतिक्रिया देत नाही; परंतु अशा प्रकारच्या कृत्यांनंतर गप्प आणि निष्क्रीय रहाण्याची एक मर्यादा असते. भारतातील प्रसारमाध्यमे ज्यू राष्ट्रावरील आक्रमणाविषयीच्या बातम्या देणे बंद करतात. मुलांनी खचाखच भरलेल्या शाळांच्या बसेस, सार्वजनिक ठिकाणे, व्यापारी संकुले (शॉपिंग मॉल्स), सभास्थाने, रुग्णालये आणि व्यावसायिक आस्थापने या सर्व जागा इस्लामी आतंकवाद्यांचे लक्ष्य असतात. पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (पी.एल्.ओ.) सह अनेक आतंकवादी संघटना इस्रायलविरुद्ध अथकपणे आतंकवादी कारवाया करत होत्या. या आतंकवादी संघटनांनी सहस्रो इस्रायली लोकांचे प्राण घेतले आहेत; पण प्रसारमाध्यमांनी या भीषण कृत्यांना प्रसिद्धी दिली नाही; परंतु जेव्हा इस्रायली संरक्षण दल त्याच्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रतिआक्रमण करत, तेव्हा या प्रसारमाध्यमांची भूमिका पालटायची आणि ते आपापल्या वृत्तपत्रांमध्ये त्याविषयी ठळक मथळे अन् संपादकीय लेख प्रसिद्ध करतात. ही वृत्तपत्रे वाचणारे भोळे वाचक वरून साखर पेरलेले हे विष न ओळखता स्वीकारतात.

४. ‘मिला १८’ या कादंबरीत जर्मन सैन्याने संपूर्ण ज्यू समुदायाची अमानुषपणे कत्तल केल्याचा उल्लेख
या प्रश्नाशी निगडीत लिऑन युरिसने लिहिलेल्या ‘मिला १८’ या कादंबरीतून मला या संदर्भात पहिल्यांदा कल्पना आली. नाझी अत्याचाराला आव्हान देणार्या ‘घेट्टो उठावा’च्या वेळचे हे एक हृदय पिळवटून टाकणारे ते लिखाण होते. जर्मन सैन्याने हातात येईल त्या शस्त्रांनी संपूर्ण ज्यू समुदायाची कत्तल केली होती. सोन्याचे दागिने घातले आहेत कि नाहीत ? हे शोधण्यासाठी मेलेल्या ज्यू लोकांच्या मृतदेहांची कसून तपासणी केली जायची. त्यांच्या तोंडात सोन्याचे दात आहेत का ? यासाठी मृतदेहांचे जबडे उघडले जायचे आणि सोने सापडले, तर पक्कडने ते सोने काढून जर्मन युद्धनिधीसाठी पाठवले जात असे. त्यानंतर ते मृतदेह आगीत जाळले जायचे आणि नंतर मिळणारी हाडांची पूड जर्मनीच्या शेतांमध्ये खत म्हणून वापरली जात होती.
विल्यम शेक्सपिअरने त्याच्या ‘द मर्चंट ऑफ व्हेनिस ’(वर्ष १५९८) या प्रसिद्ध नाटकात ‘शायलॉक’ नावाचे एक ज्यू पात्र दाखवले होते. शायलॉक एका टप्प्यावर म्हणतो की, दुःख ही त्याच्या समुदायाची खूण आहे. या नाटकानंतर ४३० वर्षांनंतरही ज्यूंच्या दुःखांचा अंत झालेला नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे.
५. हमासच्या आतंकवाद्यांनी केलेला नरसंहार आणि भारतीय प्रसारमाध्यमांनी केलेली दिशाभूल
७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हमासच्या आतंकवाद्यांनी ‘सिमहत तोराह’ या ज्यूंच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जमलेल्या यहुदी नागरिकांवर आक्रमण केले. या वेळी महिला आणि मुले यांसह १ सहस्र २०० हून अधिक इस्रायली नागरिकांची हमासच्या आतंकवाद्यांनी कत्तल केली. मार्क्सवादी आणि भारतातील मुल्ला या आतंकवाद्यांचे वर्णन स्वातंत्र्यसैनिक म्हणून करतात. आतंकवाद्यांनी २५० हून अधिक लोकांचे अपहरण केले, महिलांवर बलात्कार केला, त्यांची हत्या केली आणि घरात प्रार्थना करणार्या अनेक लोकांना पेटवून दिले.
इस्रायलकडे जी काही शस्त्रास्त्रे होती, ती वापरून इस्रायलने प्रत्युत्तर दिले. ‘हमासने अपहरण केलेल्या पीडितांपैकी शेवटच्या व्यक्तीची सुटका केल्यानंतर आणि आतंकवादी संघटनेने गाझापट्टी सोडल्यानंतरच युद्ध थांबवले जाईल’, असे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी घोषित केले. इस्रायलच्या संरक्षणदलाने केलेल्या आक्रमणात आपल्या जवळच्या आणि प्रियजनांच्या मृत्यूविषयी शोक करणार्या मुसलमान महिलांची छायाचित्रे भारतातील प्रसारमाध्यमांनी प्रसारित केली. त्यामुळे ‘या नरसंहारात इस्रायलीच गुन्हेगार होते’, असे केरळमधील वृत्तपत्रांच्या वाचकांना आणि मल्याळम् दूरचित्रवाहिन्या पहाणार्या प्रेक्षकांना वाटले असेल. या दूरचित्रवाहिन्यांचे सूत्रसंचालकही इस्रायलच्या संरक्षणदलाने केलेली घोषणा रहित करावी, या मागणीमध्ये सहभागी होते.
६. इस्रायली पत्रकार एलोन पेन्झेल याच्या ‘टेस्टीमनीज विदाऊट बाऊंड्रीज’ या पुस्तकात लिहिलेली हमासच्या आक्रमणाची भयावहता
एक तरुण इस्रायली पत्रकार एलन पेन्झेल (वय २४ वर्षे) याने एक धाडसी मोहीम हाती घेतली आणि हमासच्या आतंकवाद्यांनी आक्रमण केलेल्या ठिकाणांना भेट दिली. त्याने भेट दिलेली ठिकाणे आणि ज्या व्यक्तींशी त्याने खुली चर्चा केली होती, अशा व्यक्तींवर आधारित ‘टेस्टिमनीज विदाऊट बाऊंड्रीज’ (सीमा नसलेली साक्ष) हे पुस्तक त्याने लिहिले. ‘झाका’च्या (हिब्रू भाषेत ‘झिह्यू कार्बानोट एसोन’ – इस्रायलमधील आपद्ग्रस्त पीडितांची ओळख पटवून त्यांना बाहेर काढण्यास साहाय्य करणारे पथक) स्वयंसेवकांसह त्याने घेतलेल्या मुलाखती हा या पुस्तकाचा कणा आहे.
लष्कर-ए-तोयबा या प्रमुख सूत्रधार असलेल्या आतंकवादी संघटनेने २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी भारतातील मुंबई येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर ‘झाका’ हे नाव भारतीय बातम्यांच्या मथळ्यांमध्ये आले होते. लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांनी डझनाहून अधिक ज्यू लोकांची कत्तल केली आणि या आतंकवाद्यांच्या एके ४७ च्या आक्रमणात मृत्यू झालेल्या मृतदेहांची काळजी घेण्यासाठी झाकाचे पथक मुंबईत दाखल झाले. वर्ष १९८९ मध्ये स्थापन करण्यात आलेले ‘झाका’ स्वयंसेवक हे आपद्ग्रस्तांची ओळख पटवण्याचे आणि अंत्यविधीसाठी मृतदेह बाहेर काढण्यातील तज्ञ आहेत.
७. ‘झाका’ पथकाच्या प्रमुखाने सांगितलेली हमासची भयावहता
पेन्झेल याने ‘झाका’ पथकाची मुलाखत घेतली. यामध्ये या पथकाचा नेता सिमचा ग्रीनमन आणि झिहुई असोन यांचा समावेश होता. त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवावरून हमासच्या आतंकवाद्यांनी निष्पाप लोकांचे कसे प्राण घेतले ? महिला आणि मुले यांच्यावर बलात्कार करून त्यांची कशा प्रकारे निर्दयतेने हत्या केली ? याची कल्पना येते. पेन्झेल याने घेतलेल्या मुलाखतीत सिमचा म्हणाला, ‘‘बालवाडीतील ३ वर्षांच्या मुलाच्या डोक्याच्या कवटीत चाकू खुपसण्यात आला होता आणि त्याच्या शेजारी भूमीवर एक हातोडा होता. हातोडीवरच त्याच्या कवटीचे तुकडे पडले होते.’’ म्हणजे ज्यू म्हणून जन्माला आल्याविषयी ही शिक्षा ! आपल्या कट्टर शत्रूंनाही अशी शिक्षा भोगावी लागू नये, अशी आपण सर्वशक्तीमान देवाकडे प्रार्थना करावी या टप्प्यावर पेन्झेल आपल्याला घेऊन जातो. पीडितांचा शोध आणि त्यांना साहाय्य करण्याच्या मोहिमेच्या दरम्यान त्यांना दिसलेल्या सर्वांत भयानक दृश्यांपैकी एक दृश्य सिमचा यांनी सांगितले. एका इमारतीत त्यांना अपहरणकर्त्यांनी ज्यांच्यावर बलात्कार केला आणि देहाची विटंबना केली, अशा ३० महिलांचे नग्न मृतदेह दिसले. या पथकाने त्याच्या मोहिमेत सर्वांत भयानक प्रकारे बलात्काराने पीडित झालेल्या एका महिलेलाही पाहिले. तिने हलू नये; म्हणून त्यांनी तिच्या हातात जिवंत बाँब ठेवला आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आम्हाला ती पुढे वाकलेली, नग्न आणि गोळ्या घातलेली आढळली. दुसर्या इमारतीत ३० मृतदेह होते. त्यामध्ये बहुतांश नग्न महिला होत्या. तिथे मोठ्या प्रमाणात बलात्कार झाला होता, यात शंका नाही’, असे सिमचा यांनी सांगितले.
८. हमासच्या बंदीवासातून शेवटची इस्रायली व्यक्ती मुक्त होईपर्यंत सैन्य कारवाई चालू ठेवण्याचा इस्रायलचा निर्धार
७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी जे घडले, त्याचे सत्य पेन्झेलने सिमचा आणि त्यांच्या पथकातील सदस्यांच्या शब्दांतून उघड केले आहे. इस्रायल आणि गाझा या ठिकाणी जे घडले, त्याची ही खरी चित्रे आहेत. हमास आणि हिजबुल्ला या आतंकवादी संघटनांनी निष्पाप ज्यू लोकांवर दहशत माजवण्याचे राज्य चालू केले आहे. हमासच्या बंदिवासात असलेल्या सुमारे ६० लोकांचा जीवनासाठीचा संघर्ष चालू आहे. ‘अपहरण करण्यात आलेल्यांपैकी शेवटची व्यक्ती हमासच्या बंदिवासातून मुक्त होईपर्यंत सैन्य कारवाई चालू राहील’, हे इस्रायली पंतप्रधानांनी कोणत्याही संदिग्धतेविना स्पष्ट केले आहे. जरी बहुतांश देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत, तसेच सुरक्षा परिषदेत इस्रायलचा (मुसलमानांचे लांगूलचालन करण्याच्या एकमेव उद्देशाने) निषेध केला असला, तरी ज्यू राष्ट्र अजूनही पीडित आहे, ही वस्तूस्थिती आहे. गेल्या काही दशकांपासून ‘संयुक्त राष्ट्र म्हणजे संयुक्त मूर्खपणा’ झाला आहे.
९. पेन्झेलच्या लिखाणाला केरळमधील वैद्यकीय कर्मचार्यांनी दिलेला दुजोरा
पेन्झेल याने लिहिलेल्या या पुस्तकात ‘झाका’ पथक आणि इस्रायलमधील मानवी वसाहतींमध्ये अपंग झालेल्या व्यक्ती यांचा प्रत्यक्ष अनुभव दिलेला आहे. या वसाहतींना ‘किब्बुत्झ’ या नावाने ओळखले जाते, जे ज्यू लोकांनी एक राष्ट्र म्हणून वाटप केलेल्या विशाल वाळवंटामध्ये बांधलेली सदाहरित असणारी उद्याने आहेत. पेन्झेलच्या पुस्तकातील सामान्य प्रकरणांमध्ये अतिशयोक्तीपूर्ण विधाने आहेत, असे म्हटले जाऊ शकते; परंतु त्याच्या लिखाणाला ज्यू राष्ट्रात काम करणारे केरळमध्ये जन्मलेले आणि थोड्या कालावधीची सुटी घेऊन मूळ गावांत आलेले वैद्यकीय कर्मचारी अन् गृह परिचारिका यांनी दुजोरा दिला आहे.
(क्रमशः)
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/970996.html
संपादकीय भूमिकाज्याप्रमाणे ज्यू बांधव स्वतःच्या राष्ट्रासाठी संघटितपणे लढा देत आहेत, त्याप्रमाणे हिंदू संघटित होऊन कधी लढा देणार ? |

उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !