
मंड्या (कर्नाटक) – सप्तर्षी जीवनाडीपट्टीत करण्यात आलेल्या उल्लेखाप्रमाणे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी २१ ऑक्टोबर या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पांडवपुरा तालुक्यातील मेलुकोटे येथे असलेल्या श्री चेलुवनारायण यांचे दर्शन घेतले. या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ‘भारतासह संपूर्ण विश्वात हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर होऊ दे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभू दे अन् सर्वत्रच्या साधकांचे रक्षण होऊन त्यांनाही चांगले आरोग्य लाभू दे’, अशी प्रार्थना केली. याविषयी सप्तर्षी जीवनाडीपट्टीत उल्लेख केला होता, ‘वर्ष २०२५ चे लक्ष्मीपूजन मंगळवारी असणार आहे. मंगळवार हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा जन्मवार आहे. याच दिवशी मेलुकोटे येथील श्रीचेलुवनारायण स्वामी मंदिरात जाऊन श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी प्रार्थना करावी.’

या वेळी मंदिराचे प्रमुख पुजार्यांपैकी एक असलेले नरसिंहन् रंगन् गुरुजी यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना देवदर्शन घडवले आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी विशेष पूजा करवून घेतली. जवळच्या डोंगरावर असलेल्या प्रल्हाद पूजित स्वयंभू श्रीयोगनरसिंह स्वामी मंदिरात जाऊन तेथेही विशेष पूजा करण्यात आली. या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ३५० पायर्या चढून श्रीयोगनरसिंहाचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे दर्शन घेऊन श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी नरसिंहन् पुजार्यांच्या घरी येताच प्रचंड मोठा पाऊस आला, जणू काही श्रीमन्नारायणाने पावसाच्या रूपाने आशीर्वाद दिला.

श्री चेलुवनारायण मंदिराची पौराणिक माहिती
मेलुकोटे हा गाव कर्नाटक राज्यातील मंड्या जिल्ह्यात आहे. ‘तिरुनारायणपुरम्’ म्हणूनही ओळखले जाणारे हे क्षेत्र कर्नाटकातील श्रीविष्णूशी संबंधित तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. विशिष्टाद्वैताचे प्रवर्तक श्रीरामानुजाचार्य यांनी १२ व्या शतकात सुमारे १४ वर्षे येथे वास्तव्य केले होते.

मेलुकोटे गावात दोन मंदिरे प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे ‘श्रीचेलुवनारायण स्वामी’ (चेलुव म्हणजे कन्नड भाषेत सुंदर) मंदिर आणि दुसरे ‘श्रीयोगनरसिंह स्वामी’ मंदिर. मोगलांनी या भागावर आक्रमण करून उत्सवमूर्ती पळवली. नंतर श्रीरामानुजाचार्यांनी महंमद शाह यांची कन्या बीबी नाचियार यांच्याकडून ती परत मिळवली.
श्रीचेलुवनारायण स्वामी मंदिर मैसुरूच्या राजघराण्याच्या आश्रयाखाली होते. ओडेयार राजांनी स्वामींना मौल्यवान दागिने अर्पण केले आहेत. ओडेयार राजांनी देवाला दोन सुंदर मुकूट अर्पण केले आहेत.
वैकुंठातील श्रीविष्णूचा हिर्यांचा मुकुट मेलुकोटेमध्ये असणे !
सत्ययुगात प्रल्हाद पुत्र विरोचन नावाच्या असुराने वैकुंठात क्षीरसागरात शेषावर पहुडलेल्या श्रीविष्णूच्या मस्तकावरील हिर्यांचा मुकुट (वज्रमुकुट) पळवून नेला. गरुडाने त्याचा पाठलाग करून पृथ्वीवर विरोचनाशी युद्ध केले आणि त्याला हरवले. पुढे गरुडाने हा मुकुट मेलुकोटे येथील श्रीमन्नारायणाच्या श्रीचेलुवनारायण मूर्तीला तो मुकुट घातला. विरोचनाशी युद्ध करतांना त्या मुकुटातील एक नीलरत्न खाली एका नदीत पडले आणि ती नदी निळ्या रंगाची झाली, अशी आख्यायिका आहे. सध्या हा मुकुट कर्नाटक राज्य सरकारच्या विशेष संरक्षणामध्ये असतो. वर्षातून एकदाच या मुकुटाला मेलुकोटेला आणतात. त्या वेळी १३ दिवसांचा ‘वैरमुडी उत्सव’ साजरा केला जातो.
मेलुकोटे येथे श्री चेलुवनारायण स्वामी यांची मूर्ती कशी स्थापित झाली ?
श्रीविष्णूने आपल्या नाभीतून कमळाद्वारे ब्रह्मदेवाला निर्माण केले आणि त्याला सर्व कलांचे उपदेश दिले, तसेच जगाची निर्मिती करण्याची आज्ञा दिली; पण ब्रह्मदेवाला जग कसे निर्माण करावे ? हे कळले नाही आणि त्यांनी भगवान श्रीविष्णूचे ध्यान करण्यास आरंभ केला. तेव्हा श्रीविष्णु ब्रह्मदेवापुढे प्रकट झाले आणि त्यांना ध्यानाचे कारण विचारले. ब्रह्मदेव म्हणाले, ‘‘मला सृष्टीची निर्मिती कशी करायची ? हे कळत नाही.’’ त्यावर श्रीविष्णु म्हणाले, ‘‘तुम्ही माझी पूजा करा. मी सत्ययुगात तुम्हाला दर्शन देईन.’’ एकदा सनत कुमारांना ब्रह्मदेव ज्या श्रीविष्णूच्या मूर्तीची पूजा करत होते, ती मूर्ती भूलोकात स्थापित करण्याची इच्छा झाली आणि त्यांनी ती मूर्ती ब्रह्मदेवाकडून घेऊन यदुगिरीवर स्थापित केली. त्यानंतर ब्रह्मदेवाकडील श्रीचेलुवनारायणाची मूर्ती श्रीरामाला देण्यात आली. श्रीरामाने या मूर्तीची पूजा केली. त्यानंतर त्यांचा मुलगा कुश यानेही या मूर्तीची पूजा केली आणि नंतर ती श्रीकृष्णाच्या हाती आली. श्रीकृष्णानेही या मूर्तीची पूजा करून नंतर बलरामाकडे दिली. नंतर श्रीकृष्णाने ती मेलुकोटेमध्ये स्थापित केली. त्यानंतर काही काळ त्या मूर्तीची पूजा न होता ती तशीच राहिली. नंतर श्रीविष्णुने रामानुजाचार्यांच्या स्वप्नात येऊन ही मूर्ती एका वारूळाच्या आत आहे असे सांगितले आणि ती मूर्ती बाहेर काढून मूर्तीचा जीर्णोद्धार करण्यास सांगितले. येथील मूर्तीला ‘रामप्रिया मूर्ती’ असेही म्हणतात.
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
२९.४.२०२६ या दिवसापासून साधकाला स्वतःच्या आणि सेवेच्या संदर्भात जाणवत असलेले पालट !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या दिव्य भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधक अनुभवत असलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची असीम कृपा !