सेऊल (दक्षिण कोरिया) – दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाच्या २० सैनिकांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित घटना गंगवॉन प्रांतातील चेओरवॉन येथे घडली. दक्षिण कोरियाच्या सैनिकांनी आधी चेतावणी दिली आणि त्यानंतर गोळीबार केला. गोळीबारानंतर उत्तर कोरियाचे सैनिक मागे हटले. या घटनेमुळे दोन्ही देशांमधील संघर्ष पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. उत्तर कोरियाला चीन आणि रशिया यांचा पाठिंबा आहे, तर दक्षिण कोरिया हा अमेरिका आणि जपान यांचा मित्रराष्ट्र आहे. त्यामुळे या दोन देशांतील संघर्षामुळे आशियाई शीतयुद्धाला प्रारंभ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उत्तर कोरियाने अलीकडे अनेक क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. त्यापैकी एक चाचणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी जपान दौर्याची घोषणा केल्यानंतर करण्यात आली. दक्षिण कोरिया, उत्तर कोरियावर अण्वस्त्र नष्ट करण्यासाठी दबाव आणत आहे; पण उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी त्यास नकार दिला आहे.

डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
बांगलादेशात गेल्या ५ महिन्यांत हिंदूंविरुद्ध ६४५ गुन्हे !
Venezuela Earthquake : १० सहस्र ते १ लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !