Indian Halal Market : भारतात ‘हलाल’ खाद्यपदार्थांच्या मागणीत प्रचंड वाढ

१ लाख ७७ सहस्र कोटी रुपयांवर पोचले बाजारमूल्य !

नवी देहली – ‘ग्लोबल मार्केट इंटेलिजेंस अँड कन्सल्टंसी’शी संबंधित आस्थापन असणार्‍या ‘केन रिसर्च’ने भारतातील हलाल खाद्य बाजारावर प्रकाशित केलेल्या ‘इंडिया हलाल फूड मार्केट आऊटलूक टू २०३०’ या अहवालात म्हटले आहे की, देशातील हलाल खाद्य बाजाराचे मूल्य १९ अब्ज अमेरिकी डॉलरवर म्हणजे १ लाख ७७ सहस्र कोटी रुपयांवर पोचले आहे.

१. केन रिसर्चच्या अहवालानुसार मुसलमानांसमवेतच आरोग्याबद्दल जागरूक असलेल्या गैर मुसलमानांकडूनही हलाल खाद्यपदार्थांची मागणी वाढत आहे. त्यामुळे भारतातील हलाल खाद्यपदार्थांचा व्यवसाय सतत विस्तारत आहे.

२. हलाल खाद्यपदार्थांची मागणी प्रामुख्याने लक्ष्मणपुरी, मुंबई आणि भाग्यनगर या शहरांमध्ये सर्वाधिक आहे. या शहरांमध्ये मुसलमानांची लोकसंख्या लक्षणीय आहे. या शहरांमध्ये हलाल पदार्थांचे वितरण चांगल्या प्रकारे केले जात असल्याने ही शहरे हलाल-प्रमाणित खाद्य उत्पादनांची प्रमुख केंद्रे बनली आहेत.

३. भारतीय हलाल खाद्यपदार्थांची निर्यातही वाढली आहे, विशेषत: आखाती सहकार्य परिषद आणि आग्नेय आशियाई देश यांमध्ये ही निर्यात मोठ्या प्रमाणात होत आहे.

४. भारतातील हलाल खाद्य बाजारपेठेत एलानासन्स प्रायव्हेट लिमिटेड, अल् कबीर ग्रुप, अमारा हलाल फूड्स, बीआरएफ् एस्.ए. आणि नेस्ले एस्.ए. यांसारखी प्रमुख आस्थापने सक्रीय आहेत. त्यांची वितरण व्यवस्था, निर्यात क्षमता आणि ‘ब्रँड’ची (व्यापारी चिन्हाची) ओळख यांमुळे त्यांनी बाजारात वर्चस्व राखले आहे.


म्हशीच्या मांसाच्या निर्यातीत भारत जगात १० व्या क्रमांकावर

भारत सरकारची वैधानिक संस्था असलेल्या ‘कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणा’नुसार (‘अपेडा’नुसार) भारत म्हशीच्या मांसाचा जगातील १० वा सर्वांत मोठा निर्यातदार देश आहे. ब्राझिल, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना आणि कॅनडा हे या उत्पादनाचे प्रमुख निर्यातदार आहेत.

‘हलाल प्रमाणपत्र’ म्हणजे काय ?

इस्लामनुसार ‘हलाल’ म्हणजे जे वैध आहे, ते. पूर्वी ‘हलाल’ हे केवळ मांसापुरते मर्यादित होते; मात्र आता धर्मांधांना त्यांची स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी करायची असल्यामुळे गृहसंस्था, औषधे, सौंदर्यप्रसाधने आदी विविध गोष्टींना ‘हलाल’ प्रमाणपत्र थोडक्यात ‘ते इस्लामनुसार प्रमाणित आहे’, अशा आशयाचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी काही इस्लामी संघटना कार्यरत आहेत. त्यांनी संमत केलेल्या प्रमाणपत्राला ‘हलाल प्रमाणपत्र’ म्हटले जाते.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंनो, यातील किती पैसे जिहादी आतंकवाद, लव्ह जिहाद, धर्मांतर यांसाठी पोचले असणार ? याचा विचार करा आणि हलाल प्रमाणित पदार्थांपासून राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण करा !
  • एक दिवसापूर्वीच उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हलाल उत्पादने न घेण्याचे आवाहन केले होते आणि लगेच दुसर्‍या दिवशी माध्यमांमध्ये त्यांच्या विक्रीत वाढ झाल्याच्या बातम्या येणे, याचाच अर्थ यामागे एक मोठे षड्यंत्र कार्यरत आहे, हे लक्षात घ्या !
  • आतातरी केंद्र सरकार हलाल उत्पादनांवर भारतात बंदी घालणार आहे का ? किंवा त्यापूर्वी भाजप शासित राज्यांमध्ये, तरी ती बंदी घातली जाणार आहे का ? असे प्रश्न राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंच्या मनात उपस्थित होतात !