
बीड – येथे एका ६ वर्षांच्या मुलाच्या हातात फटाका फुटल्याने तो मुलगा एका डोळ्याने दृष्टीहीन झाल्याची घटना घडली आहे. २० ऑक्टोबर या दिवशी ही घटना घडली. त्यानंतर या मुलाला प्रथम बीड येथील सरकारी रुग्णालय आणि नंतर खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्याच्यावर उपचार चालू आहेत.
उपचार करणार्या आधुनिक वैद्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. या घटनेनंतर मुलांनी फटाके फोडतांना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (असे आवाहन करण्याऐवजी फटाके उत्पादन आणि विक्री यांवर सरकार बंदी का घालत नाही ? त्या मुलाची दृष्टी गेली त्याला उत्तरदायी कोण ? सरकारच्या अशा कुचकामी भूमिकेमुळे लहान मुले आणि लोक यांच्या जिवाला अपाय होत आहेत. – संपादक)
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच