Delhi Most Polluted : देहली पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर, तर मुंबई चौथ्या क्रमांकावर !

 देहली व मुंबई प्रदूषणात वाढ

नवी देहली – जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या सूचीमध्ये नवी देहली पहिल्या स्थानावर, तर मुंबई चौथ्या क्रमांकावर आणि कोलकाता तिसर्‍या क्रमांकावर आहे. वाहनांचा धूर, धुके, शेतातील तृण जाळणे आदींमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे.

१. देहलीमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एअर क्वालिट इंडेक्स – एक्यूआय) ४०० च्या पुढे गेला आहे. जो अत्यंत वाईट श्रेणीत येतो. ५० सामान्य मानला जातो.

२. मुंबईत एक्यूआय २८० ते ३१० इतका नोंदवला गेला आहे. वाढत्या बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ, औद्योगिक धूर आणि वाहनांची संख्या ही प्रमुख कारणे ठरत आहेत.

संपादकीय भूमिका

  • वायू आणि ध्वनी प्रदूषणामध्ये भारतातील शहरे जागतिक स्तरावर वरच्या क्रमांकावर असणे, हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
  • रज-तमाच्या प्रदूषणात भारताच्या तुलनेत जगातील बहुतेक शहरे वरच्या क्रमांकावर आहेत, यात कुणालाही शंका नसणार !