
मैसुरू – सप्तर्षी जीवनाडीपट्टीत करण्यात आलेल्या उल्लेखाप्रमाणे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी २० ऑक्टोबर या दिवशी नरकचतुर्दशीच्या निमित्ताने मैसुरू येथील श्री चांमुडेश्वरी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ‘भारतासह संपूर्ण विश्वात हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभू दे अन् सर्वत्रच्या साधकांचे रक्षण होऊन त्यांनाही चांगले आरोग्य लाभू दे’, अशी प्रार्थना केली, तसेच देवीच्या चरणी वर्ष २०२६ चे कन्नड भाषेतील ‘सनातन पंचांग’ अर्पण केले.

श्री चामुंडेश्वरी देवीची पौराणिक महती
श्री चामुंडेश्वरी ही पौराणिक महती असलेली देवता असून ती ‘देवी महात्म्य’ या पुराणातील प्रमुख देवी आहे. पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या या शक्तिदेवतेने टेकडीवर वास्तव्य करणार्या महिषासुराचा वध केला, अशी कथा ‘देवी महात्म्य’मध्ये आहे. श्री चामुंडेश्वरीमुळेच या टेकडीला ‘चामुंडी बेट्टा’ (चामुंडी टेकडी) हे नाव पडले आहे. ‘स्कंद पुराण’ आणि इतर प्राचीन ग्रंथ यांमध्ये ८ टेकड्यांनी वेढलेल्या ‘त्रिमुकुट क्षेत्र’ नावाच्या पवित्र स्थळाचा उल्लेख आहे. त्याच्या पश्चिम भागात असलेले चामुंडी बेट्टा या ८ टेकड्यांपैकी एक आहे. चामुंडी बेट्टावरील श्री महाबलेश्वर मंदिर हे सर्र्वांत प्राचीन आहे. पूर्वी या टेकडीला ‘महाबलाद्री’ असेही म्हटले जात असे.
श्री चामुंडेश्वरी मंदिर कर्नाटकमधील मैसुरू या प्रमुख शहरापासून सुमारे १३ किलोमीटर अंतरावर आहे. टेकडीच्या माथ्यावर प्रसिद्ध श्री चामुंडेश्वरी मंदिर वसलेले आहे. ‘चामुंडी’ किंवा ‘दुर्गा’ हे शक्तीचे उग्र रूप आहे. ती ‘चंड’ आणि ‘मुंड’ या राक्षसांची, तसेच राक्षस महिषासुर याचा वध करणारी आहे. ती मैसुरूच्या महाराजांची कुलदेवता आणि मैसुरूची अधिष्ठात्री देवी आहे. अनेक शतकांपासून त्यांनी देवी चामुंडेश्वरीला पुष्कळ आदराने पूजले आहे. १ सहस्र वर्षांहून अधिक जुने असलेले हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. प्रारंभी तिथे तिचे केवळ स्थान होते आणि नंतरच्या काळात आज दिसते तसे मोठे मंदिर बनले. इ.स. पूर्व १३९९ मध्ये मैसुरूचे महाराजा (वाडियार) सत्तेवर आल्यानंतर त्या स्थानाला महत्त्व प्राप्त झाले. ते देवीचे मोठे भक्त आणि उपासक होते. चामुंडेश्वरी त्यांची कुलदेवता होती. आजही धार्मिकदृष्ट्या तिला मोठे स्थान आहे. ही देवी कर्नाटक राज्याची ‘नाडदेवता’ (राज्याची कुलदेवता) या भावाने पूजली जाते.
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्या असर महंमद यास अटक !
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !