३ जणांचे निलंबन !

पुणे – पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहराच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले आहे. १८ ऑक्टोबर या दिवशी आयुक्तांनी नव्याने महापालिका हद्दीत समावेश झालेल्या शेवाळवाडी-मांजरी परिसरातील अस्वच्छता, मलनि:स्सारण व्यवस्था, रस्त्यावरील खड्डे, अतिक्रमण, नालेव्यवस्था, गलिच्छ दुभाजक यांची पहाणी केली. वारंवार सूचना देऊनही कारवाई न करणार्या आणि मनमानी करणार्या अधिकार्यांवर या वेळी आयुक्तांनी कारवाई केली. हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे यांचे स्थानांतर करून त्यांच्या जागी अभियंता रवी खंदारे यांची नियुक्ती केली. मलनि:सारण विभागाचे शाखा अभियंता, घनकचरा विभागाचे आरोग्य निरीक्षक आणि मुकादम हे व्यवस्थित काम करत नसल्याने त्यांना निलंबित करण्यात आले.
यापूर्वीही नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत येणार्या वाघोली परिसराची पहाणी केली होती. मलनि:स्सारण आणि अतिक्रमणे या कारणाने साहाय्यक आयुक्त शीतल वाकडे, मलनि:स्सारण विभागातील उपअभियंता विनायक शिंदे आणि गणेश पुरम यांच्यावर कारवाई करत त्यांचे स्थानांतर केले होते. ‘शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळणे, हा त्यांचा अधिकार आहे. यासाठी महापालिकेच्या अधिकार्यांनी प्रभावीपणे काम करणे आवश्यक आहे. कामात दिरंगाई केल्यास संबंधित अधिकार्यावर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे मत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केले.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !