आरोपीस २ दिवसांची पोलीस कोठडी !विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करणारे शिक्षण क्षेत्रासाठी कलंकच ! |

पिंपरी (पुणे) – महापालिकेच्या शाळेत इयत्ता ४ थीमध्ये शिकणार्या अल्पवयीन विद्यार्थिनीसमवेत वर्गशिक्षकाने अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद करून आरोपी वर्गशिक्षक मनोज धाईंजे याला अटक केली आहे. आरोपी धाईंजे हा वाल्हेकरवाडी येथील महापालिकेच्या शाळेत कार्यरत आहे. घटनेच्या दिवशी विद्यार्थिनी वर्गात उपस्थित होती, त्या वेळी शिक्षकाने तिच्या जवळ जाऊन गैरवर्तन केल्याचे प्राथमिक अन्वेषणातून समोर आले. विशेष म्हणजे त्या वेळी वर्गात इतर विद्यार्थी उपस्थित असतांनाही शिक्षकाने हे कृत्य केल्याचे समजते. झालेल्या घटनेनंतर घाबरलेल्या विद्यार्थिनीने घरी जाऊन पालकांना घडलेला प्रकार सांगितला. पालकांनी तात्काळ चिंचवड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी धाईजे याला अटक करून न्यायालयात उपस्थित केल्यानंतर त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !
महापालिकेच्या कर संकलन विभागाची २ कोटी ५७ लाख रुपयांची फसवणूक !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
लोहगडावरील मृत्यू घातपातच !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज