स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘नोकरी गेली म्हणजे, माणूस व्याकुळ होऊन एका कार्यालयातून दुसर्या कार्यालयात नोकरी शोधत भटकतो ! अशीच व्याकुळता भगवंताप्रती पाहिजे.’ ‘व्याकुळतेविना आध्यात्मिक जीवनात काहीच लाभत नाही. सतत साधूसंग करत राहिल्याने चित्तामध्ये भगवंतासाठी व्याकुळता निर्माण होते. एखाद्या माणसाच्या घरी कुणी आजारी असला, तर त्या माणसाची मनःस्थिती कशी असते ? ‘आजारी व्यक्ती कशी बरी होईल ?’, या विचाराने त्याचे चित्त सतत बेचैन असते. ही व्याकुळताही तशीच असते. जो भगवंतासाठी व्याकुळ झालेला आहे, तो खाणे-पिणे इत्यादींसारख्या क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष देऊ शकत नाही.
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !