सध्या ‘मना’चे श्लोक’ या चित्रपटाला हिंदु संघटनांनी प्रचंड प्रमाणात विरोध केला. त्याचे कारण असे की, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारख्या समाजाचा पाया आणि कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त करणार्या विषयावरच्या या चित्रपटाला समर्थ रामदासस्वामी यांच्या ‘मनाचे श्लोक’ या पवित्र हिंदु श्लोक रचनेचे नाव दिले गेले आहे. चित्रपटाचा विषय आणि त्याचे नाव यांचा काडीमात्र संबंध नाही; मात्र असंबंध नाव घेऊन वाद निर्माण करायचा अन् त्यातून चित्रपटाला प्रसिद्धी मिळवायची, असा कदाचित् विचार असू शकतो.

१. हिंदूंच्या विरोधात कटकारस्थान नव्हे ना ?
वास्तविक मराठी चित्रपटसृष्टी आशयघन, समृद्ध आणि अभिमानास्पद परंपरा लाभलेली अशी आहे. असे चित्रपट चालवायची आवश्यकता मराठी चित्रपटाच्या काही निर्मात्यांना का पडू लागली आहे ? काही दिवसांपूर्वी ‘खालिद का शिवाजी’ हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करणारा चित्रपट प्रसिद्ध करण्यात आला होता. चित्रपट कचर्यात गेला, हे जरी खरे असले, तरी हे सगळे नेमके कशासाठी चालले आहे ? चित्रपटाच्या वादग्रस्ततेतून प्रसिद्धीसाठी ? अंगातील ‘सेक्युलर’ (निधर्मी), हरामखोरगिरीसाठी ? कि शांत असलेल्या हिंदु समाजाला भडकवत त्याला हिंसक म्हणून समाजासमोर आणण्याच्या कटकारस्थानाचा भाग म्हणून ? ‘भगव्या आतंकवादा’च्या नावाच्या निर्मितीमागचे सूत्रधार अजूनही जिवंत आहेत. एवढेच नव्हे, तर त्या सूत्रधारांची पाळेमुळे आता अधिकच बडबड करू लागली आहेत, हे दिसत आहे. त्यांचे तर हे प्रताप नसावेत ?
शांत आणि सहिष्णू असलेल्या हिंदु समाजाला भडकवण्याचे प्रबोधन कार्य करणार्या अन् वर ‘आमच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर मर्यादा आणली जात आहे’, अशी बोंबाबोंब करणार्या चित्रपटसृष्टीतील अशा उपटसुंभांना उलटे टांगून मिरचीची धुनी द्यावी, अशी इच्छा होते; पण हिंदु ‘डी.एन्.ए.’मधील (जनुकामधील) सहिष्णुता नको तेव्हा आडवी येते.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारख्या (विवाह न करता एकत्र रहाणे) अनैतिक विषयावरच्या चित्रपटाला समर्थ रामदासस्वामी यांच्या ‘मनाचे श्लोक’ या धार्मिक ग्रंथाचे नाव कशासाठी ?
– श्री. अविनाश गंगाधर पराडकर
२. इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्माविषयी चित्रपट काढण्याचे धाडस आहे का ?
या सगळ्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यांमध्ये जर धाडस असेल ना, तर एकदा हदिस, सीरत, कुराण, बायबल अशी नावे घेऊन ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ किंवा अशा विषयावरचा एखादा चित्रपट काढून दाखवावा. अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे काय असते, हे त्यांना तेव्हाच समजेल. मुसलमान किंवा ख्रिस्ती समाज हा धर्माविषयी अतिशय संवेदनशील असतो. त्यांना धर्मच सर्वोच्च स्थानी असतो. ही त्यांची चूक अजिबात नाही. चित्रपटांच्या नावाखाली चाललेली ही वाटचाल पहाता वाटते की, चूक काही लाचार हिंदूंची आहे, जे स्वतःच स्वतःच्या हिंदु धर्माची अपकीर्ती करत आहेत आणि उरलेले हिंदू सहिष्णुततेच्या नावाखाली सवंग अभिव्यक्ती अन् मत स्वातंत्र्याला मान्यता देत आहेत. हिंदूंना धार्मिक भावना जपण्यासाठी आंदोलने का करावी लागतात ?
३. नाठाळांनी वेळीच स्वतःला आवरावे !
एवढेच वाटते की, फार काळ कुणी हिंदूंच्या भावनांशी असा खेळ करत राहू नये. समर्थ रामदासस्वामी यांनी खर्या हिंदूंना सामर्थ्याची शिकवण तर दिलेलीच आहे, तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाच्या माथी हाणू काठी ।।’, असा उपदेशही करून ठेवला आहे.
तो आचरणात आणण्याची वेळ येऊ देऊ नका. हिंदू सहसा पेटत नाही; पण पेटला, तर अशा अभिव्यक्तीस्वातंत्र्याला योग्य ती जागा दाखवून देईल, हा इतिहास आहे ! तो परत परत कुणी सांगायला लावू नये ! नाठाळांनी वेळीच स्वतःची माथी आवरावीत सगळ्याच अर्थांनी !!
– श्री. अविनाश गंगाधर पराडकर, सिंधुदुर्ग.
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
‘खालिद के शिवाजी’ हिंदुविरोधी चित्रपट ‘ओटीटी’वर प्रदर्शित !