शाळेला देण्यात आली २ दिवस सुट्टी
(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र)
कोची (केरळ) – येथील पल्लुरुथी भागातील ‘सेंट रीटा पब्लिक स्कूल’ या शाळामध्ये आठवीच्या विद्यार्थिनीने हिजाब परिधान केल्यामुळे वाद निर्माण झाला. यामुळे शाळेने १३ आणि १४ ऑक्टोबर अशी २ दिवसांची सुटी घोषित केली.
शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर हेलेना आरसी यांनी एक पत्र प्रसारित केले आहे. यात त्यांनी म्हटले की,
१. एका विद्यार्थिनीने गणवेशाऐवजी हिजाब घालणे चालू केले होते. यावर जेव्हा शाळेच्या व्यवस्थापनाने आक्षेप घेतला आणि तिला शाळेच्या प्रवेशद्वारावर थांबवले, तेव्हा विद्यार्थिनीच्या पालकांनी हा धार्मिक अधिकार असल्याचे सांगून गोंधळ घातला.
२. विद्यार्थी आणि तिचे कुटुंबीय यांच्या दबावामुळे काही शिक्षक आणि विद्यार्थी यांना मानसिक ताण आला होता. परिणामी पालक-शिक्षक संघटनेशी चर्चा केल्यानंतर २ दिवसांची सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षण विभागाच्या अधिकार्यांनी शाळेला भेट दिली आणि प्रकरणाची चौकशी केली.
🚨 Hijab Row in Kerala Convent School!
📍 Kochi’s St. Rita Public School shut for two days after an 8th grade girl insisted on wearing Hijab despite uniform rules.
🎥 Tension flared as parents created a scene, backed by SDPI affiliates.
😟 Teachers, students under pressure;… pic.twitter.com/QTnk9GseyE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 14, 2025
‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’च्या व्यक्तींमुळे तणाव
शाळेच्या शिक्षक-पालक संघटनेच्या सदस्या जोशी कैथवलप्पिल म्हणाल्या की, गेल्या ३० वर्षांपासून शाळेत एकसमान गणवेश आहे आणि सर्व धर्माचे विद्यार्थी त्याचे पालन करतात. संबंधित विद्यार्थिनीने ४ महिने हा नियम पाळला; परंतु १० ऑक्टोबरपासून तिने डोके झाकण्यास चालू केले. जेव्हा शाळेने यास नकार दिला, तेव्हा विद्यार्थिनीच्या पालकांनी तिला डोके झाकून येऊ देण्याचा आग्रह धरला. ते काही लोकांसह शाळेत आले आणि चित्रीकरण करून गदारोळ करू लागले. यामुळे मुले आणि शिक्षक घाबरले; म्हणून शाळा बंद करावी लागली. ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ या इस्लामी पक्षाशी संबंधित व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे हा वाद पेटला आहे. (बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा हा राजकीय पक्ष आहे. आता त्याच्यावरही बंदी घालण्याची आवश्यकता आहे, हेच यावरून स्पष्ट होते ! – संपादक)
(म्हणे) ‘हिजाब घालणे, हा आमचा अधिकार आहे !’ – मुलीचे वडीलविद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलीने या वर्षी शाळेत प्रवेश घेतला आहे. पूर्वी शाळेने केवळ वर्गात डोके झाकण्यास मनाई केली होती; परंतु आता ते प्रवेशद्वारावरच प्रतिबंधित केले जात आहे. याचा समानतेवर परिणाम होतो. हा आमचा अधिकार आहे. या प्रकरणाची तक्रार जिल्हा शिक्षण अधिकारी आणि संबंधित मंत्री यांच्याकडे केली आहे. जर शाळेने तिला डोके झाकण्याची अनुमती दिली नाही, तर आम्ही तिला दुसर्या शाळेत पाठवू. (केरळ पाकिस्तानात नाही, हे यांना सांगणे आवश्यक आहे. जर या देशात हिजाब आणि अन्य इस्लामी वस्त्रांवर बंदी घातली, तर ते देश सोडून जाणार आहेत का ?, असा प्रश्न उपस्थित होतो ! – संपादक) संपादकीय भूमिकाअधिकाराची आठवण असणार्यांना देशाप्रतीची कर्तव्ये मात्र आठवत नाहीत आणि त्यानुसार कृतीही करत नाहीत ! भारताची फाळणी धर्माच्या आधारे झाली होती आणि मुसलमानांना पाकिस्तान देण्यात आला असतांनाही जे येथे राहिले, त्यांनी त्यांच्या अधिकारासाठी पाकमध्ये चालते व्हावे, असेच आता जनतेला वाटते ! |

गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !