वैद्यकशास्त्र किंवा शरीरक्रियाशास्त्र यांतील वर्ष २०२५ चे ‘नोबेल’ पारितोषिक अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंको (Mary E. Brunkow), फ्रेड रॅम्सडेल (Fred Ramsdell) आणि जपानचे शिमोन साकागुची (Shimon Sakaguchi) यांना संयुक्तपणे घोषित करण्यात आले आहे.

मानवी शरिराची रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्याच निरोगी पेशींवर आक्रमण करण्यापासून (ऑटोइम्युन डिसीज) कशी रोखली जाते, याविषयीच्या महत्त्वपूर्ण शोधासाठी त्यांना हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला आहे. या तिन्ही शास्त्रज्ञांनी ‘पेरिफेरल इम्युन टॉलरन्स’ (Peripheral Immune Tolerance), म्हणजेच ‘परिधीय रोगप्रतिकारक सहनशीलता’ या विषयावर मूलभूत संशोधन केले आहे.

१. नेमका शोध काय ?
आपल्या शरिराची रोगप्रतिकार प्रणाली बाहेरील जंतू आणि विषाणू यांवर आक्रमण करते; मात्र ती चुकून आपल्याच शरिरातील पेशी आणि ऊती (समान कार्य करणार्या पेशींचा समूह) यांना हानी पोचवत नाही. हे कसे घडते, याचे गूढ या शास्त्रज्ञांनी उलगडले.
शिमोन साकागुची यांनी ‘रेग्युलेटरी टी-सेल्स’ (Regulatory T cells) नावाच्या विशेष रोगप्रतिकारक पेशी शोधून काढल्या. या पेशी शरिरातील इतर आक्रमक रोगप्रतिकारक पेशींना नियंत्रित ठेवतात आणि त्यांना शरिरावरच आक्रमण करण्यापासून रोखतात. त्यांना रोगप्रतिकार प्रणालीचे ‘सुरक्षारक्षक’ म्हटले जाते.
मेरी ई. ब्रंको आणि फ्रेड रॅम्सडेल यांनी ‘फॉक्सपी३’ (Foxp3) नावाच्या जनुकाचा (gene) शोध लावला, जो या ‘रेग्युलेटरी टी-सेल्स’ची निर्मिती आणि कार्य यांसाठी अत्यंत आवश्यक असतो. या जनुकात काही दोष निर्माण झाल्यास गंभीर ‘ऑटोइम्युन’ आजार होऊ शकतात’, हे त्यांनी सिद्ध केले.
या तिघांच्या संशोधनामुळे रोगप्रतिकार प्रणालीचे संतुलन कसे राखले जाते, हे समजण्यास साहाय्य झाले आहे. यातून ‘ऑटोइम्युन डिसीज’मध्ये उपचारांत नवी दिशा मिळाली असल्याचे पाश्चात्त्य वैद्यकाचे मत आहे.

२. ‘ऑटोइम्युन डिसीज’ आणि ‘स्टिरॉईड्स’च्या वापराने दुष्परिणाम
एक मत असेही होते की, ‘ऑटोइम्युन डिसीज’मध्ये वाढ होईल’, असे मी कोरोना महामारीत देण्यात येणार्या लसीच्या टोचणीनंतर सातत्याने लिहीत आलो आहे. त्यानुसार प्रत्यक्ष बाह्य रुग्ण कक्षामध्येही (‘ओपीडी’मध्ये) विविध ‘ऑटोइम्युन डिसीज’चे पुष्कळ रुग्ण चालू आहेत. बहुतांशी रुग्णांना रसायुर्वेदाच्या उपचारांनी उत्तम लाभ मिळत आहे. यातील बहुतेकांची ‘स्टिरॉईड्स’ आपण बंद केली आहेत.
‘ऑटोइम्युन’मध्ये ‘स्टिरॉईड्स’ देऊच नयेत’, असे माझे जागतिक अभ्यासाअंती झालेले मत परिषदा (कॉन्फरन्स) आणि रुग्ण अशा दोन्ही ठिकाणी मांडले होते. ‘त्याच्या लाभाहून अधिक तोटा होतो’, हे प्रत्यक्ष अनुभव आणि जागतिक आकडेवारी सांगत होती; पण ‘स्टिरॉईड्स’ना पर्याय नाहीच’, असे पाश्चात्त्य वैद्यकाकडून सांगितले जात असल्याने आणि ‘तसे न केल्यास भयानक दुष्परिणाम होतील’, अशी भीती घातली जात होती. याचा अनेकांनी अनुभव घेतला असेलच.
प्रत्यक्षात ‘स्टिरॉईड्स’चा वापर, म्हणजे एखाद्या बंडखोराला रोखण्यासाठी संपूर्ण शहरच ‘लॉकडाऊन’ (दळणवळण बंदी) करण्यासारखे आहे. यामुळे आक्रमण करणार्या ‘बंडखोर’ पेशी तर शांत होतात; पण त्यासह शरिराचे रक्षण करणार्या ‘सैनिक’ पेशींची (जंतूंशी लढणार्या पेशींची) शक्तीही न्यून होते. यामुळे रुग्णाला इतर संसर्ग (इन्फेक्शन्स) होण्याचा धोका वाढतो आणि ‘स्टिरॉईड्स’च्या वापराचे अनेक दुष्परिणाम (साईड इफेक्टस) होतात.
३. ‘स्टिरॉईड्स’मुळे होणारे काही सामान्य आणि गंभीर परिणाम
अ. शारीरिक पालट : चेहर्यावर सूज येणे (Moon Face), वजन वाढणे, पोटावर चरबी जमा होणे, त्वचेवर व्रण उठणे. यामुळे रुग्णाचा आत्मविश्वास पूर्णपणे खच्ची होतो. मूत्रपिंड (किडनी), यकृत (लिव्हर) यांच्यावर गंभीर दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता.
अ १. हाडांची झीज (Osteoporosis) : हाडे इतकी ठिसूळ होतात की, किरकोळ दुखापतीनेही अस्थीभंग (फ्रॅक्चर) होऊ शकतो.
अ २. मधुमेह (Steroid-induced Diabetes) : रक्तातील साखर अनियंत्रितपणे वाढते.
अ ३. उच्च रक्तदाब आणि हृदयविकार : हृदयावर गंभीर ताण येतो.
अ ४. डोळ्यांच्या समस्या : मोतीबिंदू (Cataract) आणि काचबिंदू (Glaucoma) होण्याचा धोका वाढतो.
आ. मानसिक परिणाम : तीव्र ‘मूड स्विंग्स’ (स्वभावात पालट होणे), चिडचिड, नैराश्य (Depression) आणि निद्रानाश हे रुग्णाला आतून पोखरून काढतात.
इ. संसर्गाचा धोका : रोगप्रतिकार शक्ती दाबल्यामुळे कोणताही छोटा-मोठा संसर्ग गंभीर रूप घेऊ शकतो.
या सगळ्यामुळे रुग्ण आजाराने अल्प आणि औषधांच्या परिणामांनी अधिक खचून जातो. त्याचे सामाजिक आणि व्यावसायिक आयुष्य उद्ध्वस्त होते. अशा जगण्याला ‘गुणवत्तापूर्ण जीवन’ म्हणता येत नाही.
कर्नाटकामधील काँग्रेस सरकारचे प्राचीन हिंदु जीवनशैलीवर शिक्कामोर्तब !

कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने मासिक पाळीच्या काळात महिलांना महिन्याला १ दिवसाची, म्हणजेच वर्षाला १२ सुट्या वेतनासहित दिल्या आहेत. हा निर्णय स्वागतार्ह आहे. सरकारने विधेयक संमत केले असले, तरी ज्या महिलांना मासिक पाळीच्या काळात शारीरिक त्रास होतात, त्यांच्यासाठी १ दिवसाची सुट्टी पुरेशी नाही, तर तीनही दिवस त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्या अनुषंगानेही विचार व्हायला हवा. हिंदु कुटुंबांमध्ये वर्षानुवर्षे अशा काळात महिलांना विश्रांती दिली जायची. त्या पद्धतीवर कर्नाटक सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. ही पद्धत अन्य राज्यांमध्येही अंगीकारली गेली पाहिजे.
कर्नाटक सरकारच्या या निर्णयानंतर आता पुरोगामी काय करतील, हा खरा प्रश्न आहे. हिंदु समाजातील या परंपरेची पुरोगाम्यांनी, ‘फेमिनिस्टां’नी (स्त्रीवाद्यांनी) खिल्ली उडवली. ‘फेमिनिस्टां’नी स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली स्त्रियांची केवळ वैचारिकच नाही, तर शारीरिकही हानी केली आहे. मुळात स्त्री-पुरुष समानता अशी समानतेची संकल्पनाच अस्तित्वात नाही. स्त्री-पुरुष पूरकता असावी. घर सांभाळून नोकरी करणार्या महिलांचा आदर अवश्य करावा; पण हा जो ‘सुपर वुमन सिंड्रोम’ (सगळ्या आर्थिक गरजा भागवणारी कर्ती स्त्री असल्याची एक मानसिक आजार) ‘फेमिनिस्ट’ चळवळीने जन्माला घातला, त्याने ही हानी झाली आहे. आता महिलांच्या खर्या शारीरिक गरजा समजून निर्णय घेतले जात आहेत, त्याचे निश्चितच स्वागत केले पाहिजे.
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.
(साभार : साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट’, मराठी; १२.१०.२०२५)
संपादकीय भूमिका : स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली स्त्रीची शारीरिक आणि मानसिक हानी होऊ देणारे स्त्रीमुक्तीवाले हे स्त्रीद्रोहीच !
४. आताच्या नवीन शोधामुळे काय पालटले ?
वर्ष २०२५ च्या नोबेल विजेत्यांनी दाखवून दिले की, स्वतःच्याच शरिरात रोगप्रतिकार शक्तीला नियंत्रणात ठेवणारी एक नैसर्गिक यंत्रणा आहे, ‘रेग्युलेटरी टी-सेल्स’. त्यामुळे आता शास्त्रज्ञ संपूर्ण रोगप्रतिकार प्रणालीला दाबण्याऐवजी केवळ या ‘रेग्युलेटरी टी-सेल्स’ना अधिक शक्तीशाली करण्यावर किंवा त्यांची संख्या वाढवण्यावर लक्ष केंद्रित करू शकतात.
४ अ. याचा लाभ : हे ‘लॉकडाऊन’ करण्याऐवजी शहरात केवळ ‘शांतीसेने’ची (Peacekeeping Force) संख्या वाढवण्यासारखे आहे. यामुळे केवळ बंडखोर पेशी नियंत्रणात येतील आणि शरिराच्या मूळ संरक्षण प्रणालीवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.
५. रसायुर्वेदाचा इथे काय संबंध ?
‘व्याधीक्षमत्व’ या आयुर्वेदाच्या संकल्पनेच्याही पुढे जाऊन ‘ऑटोइम्युन डिसीज’मध्ये शोधन म्हणजेच पंचकर्म; त्यातही विशेषतः बस्ती आणि रक्तमोक्षण अन् नंतर रक्त धातू उत्तम करणारी औषधे; वेळप्रसंगी विषकन्या संकल्पनेच्या तत्त्वांचा उपयोग आणि अगद, तसेच रसायनांचा म्हणजेच तथाकथित ‘इम्युनोमॉड्युलेटर्स’ (immunomodulators) चा वापर करणे, ही रसायुर्वेदाची पद्धत आहे.
‘हा सारा किती मूर्खपणाचा विचार आहे’, यावर काही वैद्यक जिहाद्यांनी आमची मापे काढून झाली आहेत. आज काळाने त्यांनाही उत्तर दिले आहे.
‘रसायुर्वेद योग्य मार्गानेच विचार करत होता’, हे या संशोधनाने प्राथमिक तरी दिसत आहे. आता आवश्यकता असेल, गुळवेल ते हीरक आणि अश्वगंधा ते सुवर्ण; विविध वैद्य ज्या कोणत्या रसायनांचा वापर ‘ऑटोइम्युन डिसीज’मध्ये करत आहेत त्यांचा ‘रेग्युलेटरी टी-सेल्स’वर काय प्रभाव पडतो याबाबत संशोधन करण्याची. त्याहीपुढे जाऊन हा सारा मार्ग ‘गुट मायक्रोबायोम’ (gut microbiome)मधूनच (आतड्यांमध्ये रहाणार्या सूक्ष्मजंतूंची यंत्रणा) जाणार आहे. त्या दृष्टीनेही विशेष संशोधने करण्याची आवश्यकता आहे.
जाठरो भगवान् अग्निः । इति चरक ।
अहं वैश्वानरो भूत्वा..। इति भगवन्त ।
वैद्यांनी जागतिक संशोधनांविषयी सतत अद्ययावत् असले पाहिजे. प्रत्येक संशोधनाला आपल्या सिद्धांतावर पडताळून पाहिले पाहिजे, याला काही पर्याय नाही !
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (९.१०.२०२५)
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !