सर्व आरोपी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते

कन्नूर (केरळ) – येथील न्यायालयाने रा.स्व. संघाच्या २ कार्यकर्त्यांच्या हत्येच्या प्रकरणात थलास्सेरी अतिरिक्त सत्र न्यायालयाने १४ आरोपींची निर्दाेष मुक्तता केली. हे सर्व आरोपी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ज्यांना निर्दोष ठरवण्यात आले, त्यांत एन्.के. सुनील कुमार उपाख्य कोडी सुनी, के.के. महंमद शफी, के. शिनोज, टी. सुजीत, टी.के. सुमेश, टी.पी. शमील, ए.के. शम्मास, के.के. अब्बास, राहुल, के.व्ही. विनेश, पी.व्ही. विजिथ, फैसल, सारिश आणि टी.पी. सजीर यांचा समावेश आहे. अन्य २ आरोपींचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.
२८ मे २०१० या दिवशी केरळमधील नवा माहे येथे विजित आणि शिनोज या संघ स्वयंसेवकांवर बाँब फेकण्यात आला होता. आक्रमण झाले, तेव्हा विजित आणि शिनोज पल्लूरमध्ये माकपच्या एका कार्यकर्त्याशी संबंधित हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात माहे येथील न्यायालयात उपस्थिती दर्शवून घरी परतत होते.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक