वायूदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह यांचे विधान

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारतीय वायूदलाने केवळ ४ दिवसांत पाकवर विजय मिळवला, असे विधान भारतीय वायूदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह यांनी येथे केले. भारतीय वायूदलाचा ९३ वा वायूदल दिन येथील हिंडन वायूदल तळावर साजरा करण्यात आला. त्या वेळी एअर चीफ मार्शल सिंह बोलत होते.
🇮🇳 Operation Sindoor: IAF’s 4-Day Victory over Pakistan! ✈️🔥
At the 93rd Air Force Day celebrations in Hindon, Air Chief Marshal A. P. Singh proudly declared that 🇮🇳 achieved victory over Pakistan in just 4 days through Operation Sindoor.
➡️ Precise deep strikes using… pic.twitter.com/RGcwvMqvjU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 9, 2025
ते पुढे म्हणाले, ‘‘ऑपरेशन सिंदूर’मधील आमची कामगिरी आम्हाला व्यावसायिक अभिमानाने भरून टाकते. काळजीपूर्वक नियोजन, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि दृढनिश्चय यांद्वारे काय साध्य करता येते ?’, याचे ‘ऑपरेशन सिंदूर’ एक ज्वलंत उदाहरण आहे. स्वदेशी शस्त्रांद्वारे शत्रूच्या प्रदेशात खोलवर अचूक आक्रमणे करण्यात आली.’’
यावर्षीच्या वायूदल दिनाचे ब्रीदवाक्य ‘सक्षम, बलवान, आत्मनिर्भर’ असे होते. हा दिवस ‘ऑपरेशन सिंदूर’च्या शूर योद्ध्यांना समर्पित होता. यानिमित्ताने शौर्य गाजवणार्या वायूदलातील ९७ सैनिकांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.
संपादकीय भूमिकाअजून काही दिवस ही मोहीम राबवून पाकला संपूर्ण नष्ट करायला हवे होते, अशीच भारतियांची अपेक्षा होती. ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी ! |
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण