हनुमानचालिसाला मुसलमानांनी विरोध केल्याच्या घटनेनंतर वाराणसीमध्ये हिंदु संघटनांची प्रशासनाला चेतावणी

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील हनुमान मंदिराच्या पुजार्याला हनुमानचालिसाच्या पठणावरून मुसलमान पिता-पुत्राने धमकी दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याची घटना २ दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी येथील हिंदु संघटनांनी ‘जर काशीतील मंदिरांत हनुमानचालिसा ध्वनीक्षेपकावर लावू दिली जात नसेल, तर कुठल्याही मशिदीत अजान (नमाजपठणासाठी बोलावणे) होऊ दिली जाणार नाही. यासाठी आमच्यावर रासुका (राष्ट्रीय सुरक्षा कायदा) अंतर्गत गुन्हा नोंदवला किंवा चकमकीत पोलिसांनी गोळ्या झाडल्या, तरी आम्ही मागे हटणार नाही’, अशी चेतावणी दिली होती. आता हिंदु सेना नावाच्या संघटनेने ‘जर आठवड्याभरात सर्व मशिदींवरील भोंगे काढले नाहीत, तर मोठे आंदोलन उभारले जाईल’, अशी चेतावणी दिली आहे.
🚨 Varanasi | Hindu organisations warn administration:
“If loudspeakers are not removed from mosques within a week, a major agitation will be launched.”This comes after Muslims objected to the recitation of Hanuman Chalisa.
Video Courtesy: @ZeeNews pic.twitter.com/F6alanoiWO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 7, 2025
हनुमान सेनेचे अध्यक्ष सुधीर सिंह यांनी ७ ऑक्टोबर या दिवशी प्रशासनाला चेतावणी देत सांगितले की, जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर प्रत्येक घरावर मोठे स्पीकर लावून दिवसभर हनुमानचालिसाचे पठण करण्यात येईल. यामुळे ध्वनीप्रदूषण वाढले किंवा व्यवस्था बिघडली, तरी त्याचे संपूर्ण दायित्व प्रशासनाचेच असेल.
सध्या प्रशासनाकडून यावर कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
UP Poster Row : मथुरा (उत्तरप्रदेश) येथे ‘हृदयात बाबर, मुखात राम’, असा फलक लावल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते संतप्त !
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !