प्रकाशनासमवेत प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांचे व्याख्यान होणार!

सांगली, ६ आक्टोबर (वार्ता.) – येथील विलिंग्डन महाविद्यालयातील वेलणकर सभागृहात ८ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता कणेरी मठाचे प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते ‘हिंदुत्व-सामाजिक समरसता’ (लेखक-सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत, सर्वश्री भैय्याजी जोशी, सुरेश सोनी, अनिरुद्ध देशपांडे) आणि ‘हिंदुत्व – हिंदुराष्ट्र विकासपथ’ (लेखक – सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत, डॉ. कृष्ण गोपाल, श्री. दत्तात्रय होसबाळे) या पुस्तकांचे प्रकाशन केले जाणार आहे. या निमित्ताने ‘हिंदुत्व : समरसतेचा पुण्यप्रवाह’ या विषयावर प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ‘भारतीय विचार साधना प्रकाशन संस्था’, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !