‘आश्विन शुक्ल सप्तमी (२९.९.२०२५) या दिवशी कु. भावार्थ जनार्दन जाधव याचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याच्या आई-वडिलांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. जन्मापूर्वी
‘मी गर्भारपणात एका संप्रदायानुसार साधना करत होते. मी ‘ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः ।’, असा नामजप करत असे. मला गर्भधारणेच्या ९ मासांत कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही.
२. जन्म ते १ वर्ष
भावार्थचा जन्म झाल्यावर तो तेजस्वी आणि सात्त्विक दिसत होता.
३. वय – १ ते ५ वर्षे
अ. तो ३ वर्षांचा झाल्यावर आम्ही त्याला‘कॉन्व्हेंट’ शाळेत घातले होते. त्याला शाळेत सांगितली जाणारी ख्रिस्ती पंथियांची प्रार्थना आवडत नव्हती. तेव्हा तो देवतेचा नामजप करत असे.
आ. तो ‘कॉन्व्हेंट’ शाळेत शिकत असूनही त्याला मराठी भाषेचे पुष्कळ ज्ञान आहे.

४. वय – ५ ते १० वर्षे
४ अ. सात्त्विक आहार आवडणे : त्याला लहानपणापासून शाकाहारी आणि सात्त्विक अन्न आवडते, उदा. तूप आणि भात, दुधाचे पदार्थ इत्यादी. तो पुष्कळ अशक्त होता. त्याची प्रकृती चांगली होण्यासाठी आम्ही घरातील सर्वांनी त्याला मांसाहार करण्याचा आग्रह केला. तेव्हा तो ‘मांसाहार नको’, असे सांगत असे.
४ आ. देवतांची वेशभूषा करायला आवडणे : त्याने शाळेतील वेशभूषा स्पर्धेत श्रीराम, श्रीकृष्ण आणि हनुमान यांच्या वेशभूषा अनेक वेळा केल्या आहेत. त्याला देवतांसारखे अलंकार घालायला आणि त्यांच्यासारखे कपडे परिधान करायला आवडत असे.
४ इ. अध्यात्माची आवड : आम्ही घरातील सर्व जण एका संप्रदायानुसार साधना करत होतो. आमच्या घरातच त्या संप्रदायानुसार घेतले जाणारे बालोपासनेचे वर्ग होत असत. भावार्थ बालोपासनेला बसत असे. त्याला लहानपणापासूनच नामजपाची आवड आहे. तो संप्रदायानुसार सांगितलेला नामजप करत असे.

५. वय – १० ते १४ वर्षे
५ अ. भावार्थने ‘कुलदेवता आणि श्री दत्तगुरु’ यांचे नामजप करणे अन् त्याला विविध अनुभूती येणे : भावार्थ १० वर्षांचा होता. तेव्हा कोरोना महामारीच्या काळात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्ही सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनेला आरंभ केला. त्या वेळी भावार्थ ‘कुलदेवता आणि श्री दत्तगुरु’, यांचे नामजप करू लागला. त्याला नामजप करत असतांना अनुभूती आल्या. एकदा तो नामजप करत असतांना त्याला सूक्ष्मातून दिसले, ‘देव त्याला आकाशात दूर घेऊन जात आहे आणि तो हवेत तरंगत आहे.’ ही अनुभूती सांगत असतांना भावार्थचा भाव जागृत होत असे.
५ आ. सेवेची आवड
१. खोपोली येथे सनातन संस्थेचे काही उपक्रम किंवा कार्यक्रम असल्यास भावार्थ उत्तरदायी साधकांकडून स्वतःहून सेवा मागून घेतो. तो सेवा तळमळीने पूर्ण करतो. एकदा खोपोली येथे एक प्रवचन आयोजित केले होते. त्या वेळी भावार्थने जिज्ञासूंना सरबत देण्याची सेवा केली. त्या वेळी त्याच्या सभागृहाच्या आत आणि बाहेर अशा अनेक फेर्या झाल्या. नंतर प्रवचन झाल्यावर त्याच्या लक्षात आले, ‘आपण एवढ्या फेर्या मारूनही आपले पाय दुखले नाहीत.’ भावार्थची प्रकृती नाजूक आहे. त्याची शरीरयष्टीही बारीक आहे; मात्र त्याला सेवेतील आनंद अनुभवता आला. ‘सेवा करत असतांना देवच शक्ती देतो’, हे त्याने अनुभवले.
२. तो त्याच्या मित्रांना साधना सांगतो. त्याच्या एका मित्राच्या आईला साधना आवडल्यामुळे त्या मला म्हणाल्या, ‘‘तुमच्या मुलाच्या समवेत माझ्या मुलालाही साधना करू दे.’’
कु. भावार्थ जाधव याला आलेल्या अनुभूती
१. ‘एकदा मी आमच्याकडे असलेल्या मोठ्या श्रीकृष्णाच्या चित्रासमोर बसून नामजप करत होतो. तेव्हा मला दिसले, ‘सर्वत्र पांढरा प्रकाश आहे. सुदर्शनचक्र आहे. त्या सुदर्शनचक्राकडे मी खेचलो जात आहे. श्रीकृष्ण मला श्रीविष्णु, श्रीराम आणि हनुमान अशा अनेक देवतांची रूपे दाखवत आहे.’
२. मला घरी कुणी नसतांना कधी कधी देवीच्या पायांतील पैंजणांचा आवाज ऐकू येतो. मला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, असा नामजप ऐकू येतो.’
– कु. भावार्थ जाधव ( वय १४ वर्षे) (१७.६.२०२५)
६. संत आणि सद्गुरु यांच्याप्रती भाव
भावार्थच्या मनात सद्गुरु अनुराधा वाडेकर, पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या संत, वय ५६ वर्षे), तसेच सनातनचे अन्य संत यांच्या प्रती पुष्कळ भाव आहे.
७. आश्रमजीवनाची ओढ
भावार्थला मे २०२५ मध्ये सेवेनिमित्त पनवेल (देवद) येथील सनातनच्या आश्रमात जाण्याचा योग आला. आरंभी ‘भावार्थला तिकडे करमेल कि नाही ?’, अशी आमच्या मनात शंका होती; मात्र तो घरच्यांची आठवण न काढता आश्रमात आनंदाने राहिला. आम्ही भावार्थला भ्रमणभाष केल्यावर आमच्याशी तो अधिक बोलत नसे. एकदा भावार्थच्या वडिलांनी त्याला भ्रमणभाष केला. तेव्हा तो त्याच्या वडिलांना म्हणाला, ‘‘आपण सर्व जण आश्रमात राहून साधना करूया.’’ भावार्थची शाळा चालू असतांना तो आम्हाला सांगतो, ‘‘मला आठवड्यातून एकदा तरी आश्रमात रहायला जायचे आहे. मी शनिवारी आश्रमात जाऊन रविवारी घरी येईन. तेवढीच माझी तिकडे सेवा होईल.’’
– सौ. प्रिया जनार्दन जाधव (कु. भावार्थची आई), खोपोली, रायगड.
कु. भावार्थ जाधव याच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणारे श्री. अर्जुन पुजारे यांच्या भावार्थची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये
१. ‘भावार्थ व्यष्टी साधनेचा आढावा नियमित देतो. तो ‘त्याचा नामजप किती झाला ? भावजागृतीचे प्रयत्न, क्षमायाचना’, इत्यादी सूत्रे सांगतो.
२. तो ‘सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचे साधनापूर्व जीवन आणि साधना प्रवास’ हा ग्रंथ वाचत आहे. ‘या ग्रंथाचे प्रतिदिन वाचन किती वेळ झाले ? ग्रंथ वाचनातून शिकायला मिळालेली सूत्रे’, इत्यादी लिहून मला पाठवतो. तो त्या ग्रंथातील सूत्रे कृतीत आणण्यासाठी प्रयत्नरत असतो.
३. साधक घरी आल्यावर भावार्थला आनंद होतो.
४. वर्ष २०२५ च्या गणेशोत्सवाच्या कालावधीत पाली येथील नेरे (तालुका सुधागड, जिल्हा रायगड) या गावात स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिकांच्या सेवेसाठी भावार्थ माझ्या समवेत आला होता. त्या वेळी ‘प्रात्यक्षिकांची सेवा निर्विघ्न पार पडावी’, यासाठी आपण सातत्याने प्रार्थना करूया’, असे त्याला सांगितल्यानंतर त्याने भावपूर्ण प्रार्थना करण्याचा प्रयत्न केला. स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिकांची सेवा झाल्यानंतर सर्व साधक ‘आपण कुठे कमी पडलो ?’, याचे चिंतन करत होते. तेव्हा भावार्थने तत्त्वनिष्ठ राहून ‘आणखी काय करू शकतो ?’, याचे बारकावे सांगितले.’
– श्री. अर्जुन पुजारे, ठाणे (४.९.२०२५)
८. नम्रतेने बोलणे
‘भावार्थ सेवेनिमित्त गावातील लोकांकडे जातो. गावातील अनेक लोकांनी मला सांगितले, ‘‘भावार्थच्या बोलण्यामध्ये अतिशय नम्रता आहे. आम्हाला त्याच्याशी बोलतांना आनंद होतो.’’
९. नातेवाइकांना अर्पणाचे महत्त्व पटवून देणे आणि त्यांच्याकडून ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’साठी अर्पण घेणे
‘भावार्थच्या बोलण्याचा समोरील व्यक्तीवर सकारात्मक परिणाम होतो’, असे मला वाटते. भावार्थने ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे महत्त्व नातेवाइकांना सांगितले आणि त्यांच्याकडून ‘महोत्सवा’साठी अर्पण घेतले.’
– श्री. जनार्दन जाधव (कु. भावार्थचे वडील), खोपोली, रायगड.
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २३.८.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !