शेतकर्यांना दिला धीर !

सोलापूर – माढा तालुक्यातील केवड आणि वाकाव ही अतीवृष्टी अन् पूर यांनी गंभीरपणे बाधित गावे असून, पुराचे पाणी ओसरल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रत्यक्ष या गावांना भेट देऊन हानीची पहाणी केली. या गावांपर्यंत जाणारे रस्ते चिखलमय आणि अवघड असल्याने त्यांनी ट्रॅक्टरमधून प्रवास करत शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पहाणी केली. अनेक शेतकर्यांच्या शेतातील पिकांसह मातीही वाहून गेल्याचे त्यांनी पाहिले. शेतकर्यांच्या व्यथा ऐकून त्यांनी त्यांना धीर दिला आणि प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले. त्यांनी गावातील घरे आणि जनावरे यांच्या झालेल्या हानीचीही माहिती घेतली.
ग्रामस्थांशी संवाद साधतांना नागरिकांनी सांगितले की, प्रशासनाकडून तांदूळ, गहू, जेवण, जनावरांसाठी चारा आणि पिण्याचे पाणी असे आवश्यक साहाय्य मिळत आहे, याविषयी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, शेतीपिकांच्या हानीचा पंचनामा जलदगतीने पूर्ण करून अहवाल शासनाला सादर करण्यात येईल. घरांमध्ये पाणी शिरलेल्या सर्व कुटुंबांच्या खात्यावर प्रत्येकी १० सहस्र रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, माढा उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार संजय भोसले आदी अधिकारी, तसेच तालुकास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !
पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ
उद्योगस्नेही धोरण आणि दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी शासन कटीबद्ध ! – डॉ. उदय सामंत, उद्योगमंत्री
वसई येथे आलेल्या महापुरात वाहनांची हानी !