भ्रष्टाचार, तसेच पेन्शन सुधारणा यांचा रस्त्यावर उतरून केला निषेध
(जेन-झी म्हणजे १९९६ ते २०१० या कालावधीत जन्मलेली पिढी)
लिमा (पेरू) – नेपाळपाठोपाठ आता दक्षिण अमेरिकी देश पेरूमधील सहस्रावधी ‘जेन-झी’ तरुणांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या धोरणांना विरोध केला. २७ सप्टेंबरला राजधानी लिमा येथे तरुणांनी घोषणाबाजी केली आणि राष्ट्रपती दिना बोलुआर्टे यांच्या विरोधात निदर्शने केली. या वेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसेच सौम्य लाठीमारही केला. यामुळे तरुणांनी दगडफेक करण्यास आरंभ केला. पेन्शन प्रणालीत पालट झाल्यानंतर २० सप्टेंबरलाच निर्दशनांना काही प्रमाणात आरंभ झाला होता.
🔥 Gen-Z fury spreads from Asia to South America
📍 Lima, 27 Sept — thousands of youth hit the streets, angered over corruption and new pension reforms
💰 New rule: every citizen above 18 must join a pension fund
⚠️ Triggered unrest since 20 Sept
👥 Protesters raised slogans… pic.twitter.com/Q7qNq3isQW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 29, 2025
नवीन नियमांनुसार पेरूमधील १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या प्रत्येकाने कोणत्यातरी पेन्शन संस्थेशी जोडणे बंधनकारक आहे. याला तरुणांचा विरोध आहे. याखेरीज राष्ट्रपती बोलुआर्टे आणि संसदेविरुद्ध दीर्घकाळापासून सार्वजनिक असंतोष आहे.

पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी